@maharashtracity

धुळे: देवपुरातील नेहरु चौक परिसरात मध्यरात्री दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यात पिस्तुलांचा धाक दाखवत, रॉड, कोयत्याने वार करण्यात आल्याने दोन्ही गटांविरुध्द जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

देवपुरातील विटाभट्टी परिसरातील चालक सलमान शेख चिरागोद्दीन (वय ३१) याने याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार, २२ रोजी मध्यरात्री सलमान याचा मित्र रोहीत सानप हा पोलिस ठाण्यात आला होता. या वेळी मित्र रोहीत याला काय भांडण झाले आहे, अशी विचारणा केली.

तेव्हा, गाईच्या गाड्या अडवून पैसे घेतात असे सांगितल्याचा राग आल्याने नरेश गवळी व अविनाश परदेशी यांनी शिवीगाळ केली. त्यानंतर सलमान हा घराकडे जाण्याठी निघाला होता. या वेळी नरेश गवळी, अविनाश परदेशी, अक्षय जोशी, ऋषभ शिरसाठ, विशाल मराठे, लखन मराठे, आकाश पानथरे व इतरांनी त्याला अडवुन वाद घातला.

लोखंडी रॉड, काठयांनी हल्ला चढविण्यात आला. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवुन ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावरुन ८ जणांवर भादवी कलम ३०७ सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसर्‍या गटातील अक्षय जोशी याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, २२ रोजी १२.३० वाजेला देवपुरातील जुना बिलाडी रोडवरील हत्तीडोह जवळ लखन लोणारी, प्रफुल्ल भोई, गौरव नरोटे, राजेश जाधव, भूषण ठाकरे, अनिल लोणारी, अजय माळी यांनी अडवून तु नरेश गवळी सोबत का राहतो असे म्हणत मारहाण केली.

लखन लोणारी याने हातातील कोयत्याने पाठीवर वार केला. तसेच पिस्तूलचा दाखवून ६ गोळ्या घालीन असे म्हणत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन ७ जणंाच्या विरुध्द देवपुर पोलिस ठाण्यात भादवि कलम ३०७ सह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here