@maharashtracity

धुळे: साक्री शहरातील कॉलनी परिसरासह विविध ठिकाणांहून दुचाकी चोरून त्यांची विक्री करणार्‍या टोळीतील तीन संशयितांना साक्री पोलिसांनी अटक केली. तिन्ही संशयितांकडून चार लाख 50 हजार रुपयांच्या 13 दुचाकी जप्त करण्यात आल्यात.

साक्री शहरातील मुकुंदनगर, आंबापूर रोड येथून काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार साक्री पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. शहर परिसरातून आणखी काही दुचाकी चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात होता.

याबाबत पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना संशयितांची माहिती मिळाली होती. त्यानंसार निरीक्षक आहेर यांनी भावेश यशवंत हिरे (रा.गणेशपूर, ता.साक्री), राहुल रमेश भावसार (रा.भाडणे, ता.साक्री) व ज्ञानेश्‍वर गोरख सोनवणे (रा.साक्री) या तिघांना ताब्यात घेतले.

तिन्ही संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. तसेच साक्री शहरासह परिसरातून चोरी केलेल्या 13 दुचाकी कुठे विक्री केल्यात याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनीच्या सुमारे चार लाख 50 हजार रुपयांच्या 13 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.

पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली साक्रीचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक बी. बी. नर्‍हे, उपनिरीक्षक आर. बी. निकम, हवालदार बापू रायते, कॉन्स्टेबल सुनील अहिरे, चेतन गोसावी, तुषार जाधव आदींनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here