एनआयएला सत्र न्यायालयाची परवानगी
Twitter: @maharashtracity
मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी स्फोटके असलेले वाहन उभे करणे तसेच मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू प्रकरणातील तीन आरोपींविरुद्ध चौकशीसाठी नेपाळला जाण्याची परवानगी देण्याची मागणी एनआयएने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात केली होती. या अर्जाला विशेष न्यायालयाने आज परवानगी दिली आहे.
दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटक असलेले वाहन सापडले होते. या प्रकरणात 10 आरोपींना एनआयएने अटक केली होती. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.
एनआयएने मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टामध्ये या प्रकरणातील तीन आरोपींविरोधात अधिक तपास करण्यासाठी नेपाळमध्ये जाऊन चौकशी करण्याची मागणी अर्जाद्वारे केली होती. गुन्हेगारी प्रकरणाच्या तपासात किंवा खटल्यात मदत मिळवण्यासाठी एका देशाच्या न्यायालयाकडून दुसर्या देशाच्या न्यायालयाला विनंतीचे पत्र पाठवले जाते. ज्या तीन आरोपींविरुद्ध ही मागणी करण्यात आली होती त्यात संतोष शेलार, सतीश मोठुकुरी आणि मनीष सोनी यांचा समावेश आहे. या तिघांविरोधात एनआयएचे अधिकारी चौकशी करणार आहे.
एनआयएने आपल्या आरोपपत्रात दावा केला आहे की, हे तिघे 9 मार्च ते 20 मार्च 2021 दरम्यान पळून जात असताना नेपाळमध्येच राहिले होते. मंगळवारी एनआयएने याचिका दाखल केली की हीरेनच्या हत्येनंतर तिन्ही आरोपी काठमांडूमध्ये राहिले होते, त्याचा तपशील आणि पुरावे हवे आहेत. पुरावे सामायिक करण्याची विनंती पाठविली गेली नाही तर पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे.
न्यायालयाने या याचिकेला परवानगी दिली आहे. पत्र सक्षम अधिकाऱ्याला पाठवण्याचे आदेश दिले आहेत आणि त्यात त्यांना पुरावे गोळा करण्यास सांगितले आहे. 25 फेब्रुवारी 2021 रोजी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली एसयुव्ही कार सापडली होती. एसयूव्हीचा ताबा असलेला उद्योगपती हिरेन त्याच वर्षी 5 मार्च रोजी ठाण्यातील खाडीत मृतावस्थेत आढळला होता.
राष्ट्रीय तपास पथकाने विशेष न्यायालयात निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे, एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मासह दहा जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. आरोप पत्रांमध्ये दोनशे साक्षीदारांची यादी असून 164 साक्षीदारांचा जबाब दंडाधिकारी न्यायालयात नोंदवलेला आहे. कोरोनामुळे एनआयएने आरोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांचा जादा अवधी न्यायालयात मागितला होता. ही मुदत संपण्याच्या दोन दिवस आधी न्यायालयात एनआयएने सुमारे 10 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. वाझेसह नरेश गोर, विनायक शिंदे, रियाझ काझी, सुनील माने, संतोष शेलार, आनंद जाधव, सतीश मोतकरी, मनीष सोनी, आणि प्रदीप शर्मा यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
या प्रकरणात तीन एफआयआर दाखल असून स्काॅर्पियो स्फोटक प्रकरण, स्काॅर्पियो गाडी चोरी आणि मनसुख हिरेन मृत्यू असे आरोप आहेत. एनआयएने हत्या, कटकारस्थान, अपहरण, धमकी देणे, सामाजिक शांतता भंग करणे, इ. भादंवि कलम 120 ब, 201, 286, 302, 364, 384, 386, 403, 419, 506 इ. यूएपीए अंतर्गत कलम 16, 18, 20 आणि हत्यारे आणि स्फोटके कायद्यानुसार आरोप दाखल केले आहेत. मागील वर्षी 2021 मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कौर्पियो गाडीत जिलेटीनच्या कांड्या आणि धमकिचे पत्र मिळाले होते. या गाडिचा ताबा ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरन यांच्याकडे होता. मात्र मार्चमध्ये त्यांचाही म्रुतदेह ठाणे खाडीत आढळला होता. प्रारंभी वाझे मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करीत होता. मात्र एनआयएने तपास सुरू केला आणि या प्रकरणात वाझेलाच प्रमुख आरोपी केले. तसेच पोलीस दलातील अन्य काही जणांसह दहा आरोपी यामध्ये अटकेत आहेत. शर्माला देखील एन आय एने अटक केली असून सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
काय आहे प्रकरण
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत 25 फेब्रुवारी 2021 रोजी स्फोटकं सापडली होती. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती.
हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथकं घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या. मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो. स्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळलं.
मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला. मृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखं मास्क होतं. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले होते.