@maharashtracity

धुळे: मानधनाचे बिल मंजुर करण्यासाठी प्रत्येकी हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोघं डॉक्टरांना एसीबीच्या (ACB arrested two doctors) (लाच लुचपत प्रतिबंधक विभाग) पथकाने रंगेहात पकडले. आज दुपारी धुळे (Dhule) एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.

शिंदखेडा (Shindkheda) तालुक्याच्या नरडाणा (Nardana) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या तक्रारदाराने त्याने केलेल्या एनआरएचएम (NRHM) अंतर्गतच्या कामाच्या मानधनाचे १७ हजार रुपयांचे बिल मंजुर करण्यासाठी आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भुषण पंडीत मोरे (वय ३४ रा.वर्षी ता.शिंदखेडा) आणि डॉ.पंकज बारकु वाडेकर (रा.दत्त कॉलनी,साईमंदिराजवळ देवपुर,धुळे) यांनी प्रत्येकी हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार केली.

एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी करून आज दुपारी सापळा रचला. डॉ. मोरे आणि डॉ. वाडेकर या दोघांनी प्रत्येकी १ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची काम सुरु आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here