शासकीय कार्यालयांना सलग तीन दिवस लागून सुट्ट्या आल्या आणि एखादा दिवस वगळता पुन्हा एक दिवस सुट्टी असेल तर मधल्या दिवसामुळे अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अशावेळी अपवादात्मक बाब म्हणून तो मधला कामाचा दिवस सुट्टीत परिवर्तित करून सलग पाच दिवस सुट्ट्या दिल्या जाव्यात. जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनाही सलग सुट्ट्यांच्या उपयोग करून घेता येईल. सध्या शासकीय कर्मचारी संघटना अत्यंत कुशलतेने कार्यरत आहे तसेच सत्ताधारी देखील वाईटपणा नको म्हणून विधिमंडळ किंवा प्रशासकीय पातळीवर होकार देईल. सध्याची सरकारची कर्मचाऱ्यांबद्दलची सकारात्मकता विचारात घेता त्वरित हे लाभ पदरात पाडून घेण्यासाठी शासकीय कर्मचारी संघटनांनी पावले उचलावीत आणि हा नियम त्वरित लागू करून घ्यावा.

–  संजय बने, गोरेगाव, मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here