प्रदेश राष्ट्रवादीचा निर्वाळा

By Anant Nalavade

Twitter : @NalavadeAnant

मुंबई: अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आणि माझ्या संपर्कात आहेत. त्यांनी सांगितले आहे की, त्यांना धोक्याने तिथे नेले होते. मात्र ज्या ९ आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तिथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली असून काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सोमवारी येथे माध्यमांशी बोलताना दिला.

येत्या ५ जुलै रोजी शरद पवार यांनी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. या बैठकीला प्रचंड गर्दी होईल अशी खात्री व्यक्त करतानाच पवार यांच्या सोबत असणारा, आणि त्यांना पाठिंबा देणारा प्रत्येक वर्ग तिथे सहभागी असेल असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

आम्हाला काँग्रेसशी कोणताही संघर्ष करायचा नाही. नऊ आमदार सोडले तर सर्व आमदार अद्याप आमच्यासोबत आहेत. विरोधी पक्षनेते पदाबाबत विधानसभा अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील. यासाठी काही दिवस थांबावे लागेल असेही पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.

ज्याक्षणी नऊ आमदारांनी शपथ घेतली, त्याचक्षणी ते अपात्र ठरत आहेत. विधानसभा अध्यक्षांना आम्ही तसे पत्र दिले आहे. त्यांचीशी बोलणेही झाले असून ते लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षाही पाटील यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here