सलग दोन टप्प्यात सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जोरदार आक्रमक झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आता तिसर्‍या टप्प्यात विदर्भातून दिनांक ९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.

शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात 5 ऑगस्टला शिवनेरीवरुन झाली. त्यानंतर दुसरा टप्पा संत एकनाथ महाराज यांच्या पैठण येथील समाधीचे दर्शन घेवून सुरु करण्यात आला होता.
शिवस्वराज्य यात्रेत अजितदादांचा सडेतोड हल्ला…प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची जोरदार टीका… धनंजय मुंडे यांचा आक्रमक पवित्रा… खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा थेट निशाणा आणि अमोल मेटकरी यांची तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली.

या नेत्यांनी शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले असून आता तिसऱ्या टप्प्यातही हीच आक्रमकता विदर्भात पाहायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here