@maharashtracity

मुंबई: राज्यासह मुंबईत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोना रूग्ण संख्येत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले. मंगळवारी राज्यात ४,४०८ एवढी नोंद करण्यात आली होती तर बुधवारी ५,१३२ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने ७२४ रुग्णांची वाढ झाल्याचे समोर आले. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६४,०६,३४५ झाली आहे. काल ८,१९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले.

राज्यात आजपर्यंत एकूण ६२,०९,३६४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९३ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५८,०६९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान राज्यात बुधवारी १५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.११ % एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,१४,८९,०८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,०६,३४५ (१२.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३,४६,२९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत तर २,३७१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

मुंबईत दिवसभरात २८५:

मुंबईत (Mumbai) मंगळवारच्या तुलनेत बुधवारी सुमारे ८९ रूग्ण वाढ झाली. मंगळवारी मुंबईत १९६ रूग्ण नोंद असताना बुधवारी दिवसभरात २८५ नव्या कोरोना रुग्णांची (corona patient) नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७४०००७ एवढी झाली आहे. तर ५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५९३० मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here