राज्यात ६,८४३  नवीन रुग्ण 

मुंबई: राज्यात आज रोजी एकूण ९४,९८५ सक्रिय कोरोना रुग्ण (corona patient) असल्याने अद्याप कोरोना आव्हान कायम आहे. मात्र रोजची रूग्ण नोंद कमी असल्याने दिलासा मिळत आहे. दरम्यान रविवारी राज्यात ६,८४३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६२,६४,९२२  झाली आहे. 

रविवारी ५,२१२ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने आज पर्यंत राज्यात एकूण ६०,३५,०२९  कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ % एवढे झाले आहे.

तसेच रविवारी राज्यात १२३  कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या  ४,६८,४६,९८४ प्रयोगशाळा  नमुन्यांपैकी ६२,६४,९२२ (१३.३७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात ५,१७,३६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,५०६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत दिवसभरात ३६४

मुंबईत (Mumbai) दिवसभरात ३६४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७३४११८ एवढी झाली आहे. तर १० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १५८३७ मृत्यूची नोंद करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here