कृपाशंकर सिंह यांचा आत्मविश्वास

@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेत (BMC) गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेच्या काळात पालिकेत चिखल झाला आहे. मात्र, आता मुंबईकरांनी परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुकीत या चिखलातच ‘कमळ’ फुलणार आहे. भाजप पालिकेत सत्तेवर येणार आहे (BJP will win BMC polls) असा आत्मविश्वास माजी गृहराज्य मंत्री कृपाशंकर सिंह (Kripashankar Sinh) यांनी व्यक्त केला आहे.

त्यांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे शुक्रवारी आयोजित वार्तालापात त्यांनी प्रथमच पत्रकारांशी थेट संवाद साधला.

काँग्रेस व पाकिस्तानची भाषा एकच

काँग्रेसचा (Congress) त्याग करून भाजपात (BJP) प्रवेश करण्यामागील कारण स्पष्ट करताना, काँग्रेस व पाकिस्तानची (Pakistan) भाषा एकच आहे, असा गंभीर आरोप केला. वास्तविक, पक्षापेक्षा देश मोठा असतो. ३७० कलम (Article 370) हटवण्याला कॉंग्रेसने विरोध केला होता. मात्र भाजपने ३७० कलम हटवून देश प्रथम या भावनेला महत्त्व दिले
काँग्रेसने ३७० कलम हटविण्याला विरोध केल्यामुळेच आपण काँग्रेस पक्षातून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला, असे कारण त्यांनी यावेळी दिले. मात्र “दल बदला है, दिल नही’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मी साधा कार्यकर्ता आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडेन. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) ही माझी जन्मभूमी असून महाराष्ट्र (Maharashtra) ही माझी कर्मभूमी असल्याचे ते म्हणाले.

तसेच, उत्तरप्रदेशमधील जौनपूर येथून विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना तेव्हा जी परिस्थिती असेल त्याप्रमाणे व पक्ष सोपवेल त्याप्रमाणे जबाबदारी पार पाडणार असल्याचे उत्तर त्यांनी दिले.

राज ठाकरे (Raj Thackeray) व भाजप संभाव्य युतीबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, आपल्याला काही माहिती नाही, असे सांगत त्यांनी नकार उत्तर देण्यास नकार दर्शवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here