@maharashtracity

मुंबई: मुंबईत (Mumbai) बुधवारी पावसाची संततधार सुरू असताना दुपारच्या सुमारास अंधेरी (पूर्व) येथे अचानक झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत सद्दाम (३०) हा व्यक्ती जखमी झाला.

त्याला स्थानिकांनी तातडीने नजीकच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचार केल्यानंतर त्याला बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले.

पालिका प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून पावसाची संततधार सुरू असताना दिवसभरात १५ ठिकाणी झाडे, फांद्या पडण्याच्या दुर्घटना घडल्या. मात्र अंधेरी ( पूर्व), महाकाली केव्हज रोड, तक्षशिला पोलीस चौकीजवळ , रत्नदिप निवास येथे दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास अंगावर झाड पडल्याने सुदाम (३०) ही व्यक्ती जखमी झाली. त्यांना स्थानिक नागरिकांनी तात्काळ नजीकच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here