@maharashtracity

धुळे: धुळे (Dhule) जिल्ह्यात मंगळवारी एकाच दिवशी तिन अपघातात (Road accident) चार जण ठार झाले. मुंबई – आग्रा महामार्गावरील सांगवी गावाजवळ झालेल्या अपघात २ जणांचा तर शिरपूर-चोपडा मार्गावरील अजनाड गावाजवळ दुचाकी अपघातात एकाचा आणि धुळे तालुक्यातील वडेल रोडवर एकाचा अशा ४ जणांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात ५ वर्षीय बालक गंभीर दुखापती झाला.

मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावरील सांगवी गावाजवळील बोराडी फाटाजवळ दुचाकी व ट्रकचा अपघात झाला. दुचाकी गाडीने सांगवीकडून करणसिंग सखाराम पावरा (३०) राहातेडपाडा, सावन संभु पावरा (१८) रा. आसरापाणी पाडा व अमित करणसिंग पावरा (५) हे तिघे आसरापाणी येथे जात होते. त्याच वेळी ट्रक क्र. आरजे ०९- जीसी ३८७१ ने दुचाकीला धडक दिल्याने तिघे जण चिरडले गेले. तिघा जखमींना तातडीने शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र करणसिंग सखाराम पावरा आणि सावन शंभू पावरा या दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला तर अमित करणसिंग पावरा हा बालक गंभीर जखमी असून उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले. याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तसेच शिरपूर – चोपडा रस्त्यावरील अजनाड पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावरील वळणावर समोरासमोर दोन दुचाकी यांच्यामध्ये धडक झाली. या अपघातात तालुक्यातील उंटावद येथून तोंदे येथे जात असलेल्या भीमा देविदास भिल (२३) या युवकाचा मृत्यु झाला तर समोरील दुचाकी गाडीवरील रामचंद्र हिरमल पावरा रा.महादेव दोंदवाडा (२८) हा युवक गंभीर जखमी झाला. त्याच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचा सोबत असलेली त्याची वृध्द आई दुरीबाई हिरमल पावरा (६०) या किरकोळ जखमी झाल्या असून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

तर तिसरी घटना धुळे तालुक्यातील वडेल चौफुलीजवळ घडली. भरधाव मोटरसायकलच्या अपघातात अतुल प्रताप पाटील (वय ३६) रा.अजबे नगर, विद्यावर्धिनी शाळेच्या मागे, धुळे हा तरुण ठार झाला आहे. याप्रकरणी पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात सचिन जगन्नाथ बोरसे याने खबर नोंदवण्यात आली आहे. दि. २० रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अतुल पाटील हा आपली स्पेल्डर मोटरसायकल क्र.एम एच १८- ए.क्यु. ८१८५ हिच्याने बोरीस गावाकडे जात होता. तो वडेल रोडने जात असतांना वडेल चौफुलीच्या पुढे वडेल गावाकडून आलेल्या एक अज्ञात वाहनाने अतुलच्या मोटरसायकलला समोरुन जोरात धडक दिली. यात गंभीर जखमी होवून अतुल पाटील याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here