Twitter : @maharashtracity

मुंबई 

पशु वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एक नवा अभ्यासक्रम सुरु केला जाणार असून या अभ्यासक्रमाच्या नावावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच काही खासगी महाविद्यालयांमध्ये परवानगी दिली जात आहे. शिवाय नव्याने येणार अभ्यासक्रम हा पशु वैद्यकीय तत्वांवर आधारित असावा, अशी मागणी करत विद्यार्थी राज्यभर आंदोलन करत आहेत. शिवसेना सदस्य (शिंदे गट) प्रा मनीषा कायंदे यांनी या प्रश्नावर विधान परिषदेत पॉईंट्स ऑफ इन्फॉर्मेशन मांडला असताना या पशु वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधीसोबत मंत्री चर्चा करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. 

दरम्यान, पशु वैद्यकीय महाविद्यालयामध्ये एक नवा अभ्यासक्रम सुरु असून यातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या डीव्हीएससी आणि बीव्हीएससी अशा नाम साधर्म्यामुळे खरे डॉक्टर कोण याबाबत संभ्रम निर्माण होण्याची भीती विद्यार्थी व्यक्त करत आहेत. पावसाळी अधिवेशनात सरकारने विधेयक मंजूर केले आहे. यानुसार पदविका अभ्यासक्रम पशु विज्ञान शाखेचे गणले जाणार आहेत. या अभ्यासक्रमाचे नाव डिप्लोमा इन व्हेटरनरी सायन्स असे ठेवले आहे. मात्र डिग्रीचे नाव बीव्हीएससी असे आहे. एलएमडीपी करून खेड्यात काही पशुवैद्यक डॉक्टर फिरत आहेत. मात्र खरे डॉक्टर कोण याची ओळख होत नाही. यातून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने डीव्हीएससी हे नाव बदलून नर्सिंग इन ऍनिमल हजबंडरी असे ठेवावे अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या सुरु असलेल्या दहावी नंतरच्या दोन वर्षीय पदविका अभ्यासक्रमांत पशु संवर्धनाची प्राथमिक माहिती असते. मात्र हा अभ्यासक्रम पूर्ण करणारे काही जण अनधिकृत प्रॅक्टिस करत असल्याचे तक्रार करण्यात येत आहे. दरम्यान, यावर पॉईंट्स ऑफ इन्फॉर्मेशनमधून हा सवाल सदस्य मनीषा कायंदे यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर चर्चा करण्याचे आश्वासन मंत्र्यांकडून देण्यात आले असल्याचे सदस्य मनीषा कायंदे यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here