Twitter : @maharashtracity
मुंबई
राज्याचे कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील 12 लाख शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम जाहीर केली आहे. प्रत्येक शेतकऱ्यासाठी याची माहिती असणे आवश्यक आहे.
पीएम किसान योजनेत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारमार्फत वर्षाला 6 हजार म्हणजे दर 4 महिन्याला 2 हजार याप्रमाने पैसे खात्यात जमा केले जातात. तसेच यापुढे राज्याच्या नमो किसान सन्मान योजनेचे अतिरिक्त 6 हजार असे एकूण वर्षाला 12 हजार मिळणार आहेत.
- राज्यात एकुण 97 लाख पात्र शेतकरी असताना या योजनेचे पैसे फक्त 85 लाख शेतकऱ्यांनाच मिळतो. उर्वरित 12 लाख शेतकऱ्यांचे भुमी अभिलेख अद्ययावत नसणे, इ केवायसी नसणे, बँक खाते आधार जोडलेले नसणे यामुळे लाभ मिळाला नाही.
- हे लक्षात घेऊन कृषिमंत्री धंनजय मुंडे यांनी राज्यभरात एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. यात गावातील ज्या शेतकऱ्यांचे वरील तीनपैकी कोणतीही पुर्तता बाकी असेल त्याने तात्काळ गावात सरपंच/ तलाठी/ ग्रामसेवक/ कृषी सहाय्यक अथवा तालुक्याला तहसीलदार/ तालुका कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.
- सर्व सरपंच यांनीसुद्धा त्यांच्या गावातील असे शेतकरी तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्या मदतीने शोधुन त्यांच्या कागदपत्रांची पुर्तता यंत्रणेकडून करून घ्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणे सुरु होईल.
- कृषिमंत्र्यांच्या मोहिमेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशही काढले आहेत.
- या मोहिमेची मुदत वाढविण्यात येणार आहे, असे कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी आश्वासन दिले आहे.