मुंबई (Mumbai) विभागीय शालेय टेबल टेनिस (table tennis) स्पर्धेत ठाण्याच्या (Thane) लोढा वर्ल्ड स्कूलच्या (Lodha World School) सिद्धांत देशपांडे (Siddhant Deshpande) याने १४ वर्षाखालील मुलांच्या गटात सुवर्ण पदक (Gold Medal) पटकावले. सिद्धांतने अंतिम फेरीत आशय यादव याचा पराभव केला. सिद्धांत देशपांडे ठाणे येथील पिनॅकल अकादमीत (Pinnacle Academy) समीर सारळकर व प्रदिप मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तसेच १४ वर्षांखालील मुलींच्या गटात ठाण्याच्या हिरानंदानी फौंडेशन स्कुलने (Hiranandani Foundation School) सुवर्ण पदक पटकावले.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संचलित क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे द्वारा ठाणे जिल्हा टेबल टेनीस असोसिएशन व आर्य क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ आणि १५ ऑक्टोबर, २०१९ रोजी आर्य क्रीडा मंडळ ठाणे येथे खेळविण्यात आल्या. या स्पर्धा अनुक्रमे १४, १७ व १९ वर्षांखालील मुले व मुली तसेच सांघिक गटात खेळविण्यात आल्या. या स्पर्धेत नवी मुंबई, मुंबई शहर, मुंबई उपनगर, कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivli), पालघर (Palghar), वसई-विरार (Vasai – Virar), मीरा-भाईंदर (Mira – Bhayandar), उल्हासनगर (Ulhasnagar), ठाणे ग्रामिण, ठाणे शहर, पनवेल (Panvel) आणि रायगड (Raigad) या १३ विभागांमधील ७८ शाळांमधील खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेतून प्रत्येक वैयक्तिक गटातील पहिले ३ खेळाडू तर प्रत्येक गटातील विजेता संघ राज्यस्तरीय स्पर्धांसाठी पात्र ठरले आहेत.

इतर निकाल : –

वैयक्तिक निकाल –

१४ वर्षांखालील मुली – पर्ल अमलसाडीवाला – विजेती, आर्या सोनगडकर – उपविजेती

१७ वर्षांखालील मुली – टिया वाघ– विजेती, श्रावणी सावंत – उपविजेती

१९ वर्षांखालील मुली – तेजल कांबळे – विजेती, रिया सुर्यवंशी – उपविजेती

१७ वर्षांखालील मुले – मोहित शेजावळे – विजेता, ऋत्विक नागले – उपविजेता

१९ वर्षांखालील मुले – सिद्धेश सावंत – विजेता, शिवम दास – उपविजेता

सांघिक निकाल –

१४ वर्षांखालील मुली – ठाणे शहर संघ – विजेता, मुंबई शहर संघ – उपविजेता

१७ वर्षांखालील मुली – मुंबई उपनगर संघ – विजेता, ठाणे शहर संघ- उपविजेता

१९ वर्षांखालील मुली – मुंबई उपनगर संघ – विजेता, मुंबई शहर संघ – उपविजेता

१४ वर्षांखालील मुले – नवी मुंबई संघ – विजेता, मुंबई उपनगर संघ – उपविजेता

१७ वर्षांखालील मुले – नवी मुंबई संघ – विजेता, कल्याण-डोंबिवली संघ – उपविजेता

१९ वर्षांखालील मुले – ठाणे ग्रामिण संघ – विजेता, मुंबई शहर संघ – उपविजेता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here