मुंबई

मुंबईवरील हल्ल्याचा आरोपी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर पाकिस्तानात विषप्रयोग केल्याचे वृत्त समोर आले आहे. तो रुग्णालयात शेवटच्या घटका मोजतोय. दाऊदवर मुंबईवरील 1993 दहशतवादी हल्ल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात 257 लोकांना जीव गमवावे लागले होते. तर 700 हून अधिक जखमी झाले होते. यानंतर दाऊद पाकिस्तानातच राहत आहे. त्याच्यावर तेथेच विषप्रयोग झाला असून दाऊदच्या कुटुंबात कोण-कोण आहे त्याबद्दल जाणून घेऊया..

दाऊदला 7 भाऊ आणि 4 बहिणी
दाऊदचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झाला. त्याचे वडील इब्राहिम कासकर मुंबई पोलिसात हेड कॉन्स्टेबल होते. दाऊदच्या सातही भावांची नावं सबीर इब्राहिम कासकर, नूरा इब्राहिम कासकर, मुस्तिकन इब्राहिम कासकर, इकबाल कासकर, अनीस इब्राहिम आणि मोहम्मद हुमायूं इब्राहिम कासकर आहे.

दाऊदच्या चार बहिणी
दाऊदच्या चार बहिणी आहेत. फरजाना तुंगेकर, हसीना पारकर, मुमताज शेख आणि सईदा पारकर…यापैकी दोघींचा मृत्यू झाला आहे. दाऊद दुबई पळून गेल्यानंतर त्याचा व्यवसाय हसीना पारकरचा पती इब्राहिम पारकर सांभाळत होतो. मात्र अरूण गवळीच्या गँगच्या गुंडानी त्याची हत्या केली. यानंतर हसीना पारकरने हा व्यवसाय हाती घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने तिचाही मृत्यू झाला.

दाऊदच्या कुटुंबाविषयी
दाऊदने दोन लग्न केले. त्याचं पहिलं लग्न महजबीनसोबत झालं होतं. या लग्नापासून दाऊदला तीन मुले असून त्यात दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. दाऊदची मोठी मुलगी माहरुख हिचा विवाह पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियांदादच्या मुलाशी 2006 मध्ये झाला होता. दाऊदची दुसरी मुलगी मेहरीन हिचा विवाह 2010 मध्ये अमेरिकन व्यावसायिकाचा मुलगा अयुबशी झाला होता. दाऊदच्या मुलाचे नाव मोईन नवाज आहे. मोईनचे लग्न पाकिस्तानातील कराची येथे लंडनमधील एका व्यावसायिकाची मुलगी सानियाशी झाले आहे. दाऊदची दुसरी पत्नी पाकिस्तानी पठाण आहे. पण तिच्याबद्दल फारशी माहिती नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here