मुंबई
दिवसाची सुरुवात जर 15 ते 30 मिनिटांच्या वॉकने केली तर हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. त्याशिवाय तर तुम्ही रिकाम्या पोटी चाललात तर दुप्पट फायदा होतो. सकाळी वॉक केल्याने 150 हून अधिक कॅलरी बर्न करू शकाल.
आणखी काय फायदे होऊ शकतात…
- – सकाळी ३० मिनिटं रिकाम्या पोटी वॉक केल्याने तुमचं मेटॉबॉलिज्म मजबूत होतं आणि दिवसभर तुम्हाला उत्साही वाटतं.
- – वजन कमी करण्याचा प्लान असेल तर सकाळचा वॉक फायदेशीर ठरेल. पोटावरील चरबी कमी होते.
- – सकाळच्या वॉकमुळे फुप्फुसं चांगली राहतात. रोगप्रतिकारशक्ती सुधारते. सकाळचा वॉक मानसिक आरोग्यासाठी चांगला असतो. याशिवाय ताण-तणाव आणि डिप्रेशनपासून दूर राहू शकता.
-सकाळच्या वॉकमुळे ताजी हवा मिळते. सकाळी प्रदूषण कमी असतं शिवाय आवाजही कमी असतो. यावेळी तुमच्या शरीराला चांगला ऑक्सिजनही मिळतो.