@maharashtracity

अहंकार आणि राजकीय द्वेषापोटी जलयुक्त शिवारला बदनाम केल्याचा आरोप

मुंबई: जलयुक्त शिवार योजनेला (Jalyukt Shivar Yojna) बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने (MVA) या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष (MLA Ashish Shelar) शेलार यांनी दिली.

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली. त्यावेळी आघाडी कडून आरोप करण्यात आले होते की, या योजनेच्या कामात गुणवता नाही, सिंचन क्षमता वाढली नाही, पारदर्शकता नाही, असेही ते पुढे म्हणाले.

मग चौकशी अंती आता तुमच्या जलसंधारण विभागाने (Water Resource Management) ?काय उत्तर दिली ?. जलयुक्त शिवार मुळे संरक्षित सिंचनाची व्यवस्था झाली, नगदी पिकांमध्ये शेतकऱ्यांची कमाई वाढली (Farmers) , लागवडीचा क्षेत्रफळ वाढले, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली, यासाठी जी टेक्नॉलॉजी वापरली होती आणि फोटो जीओ मँपिंग (Geo Mapping) (केले गेले त्यात गुणवत्ता आणि पारदर्शकता ठेवली गेली, आणि याच्यामध्ये गावकऱ्यांचा सहभागही होता.

मग या सगळ्या गोष्टी जलसंधारण विभाग चौकशीअंती बोलत असेल तर केवळ अहंकारापोटी आणि राजकीय द्वेषापोटी तुम्ही या जलयुक्त शिवारला बदनाम केलं. हे सिध्द होते. राजकीय व्देषातून आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान केला, शेतकऱ्यांचे नुकसान केले, आता तुमचेच दात तुमच्या घशात गेले ना? असा सणसणीत टोला आमदार अँड आशिष शेलार यांनी आघाडी सरकारला लगावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here