@maharashtracity

भाजप आमदार गोपीचंद पडळकर – चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

मुंबई: भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला प्रश्न विचारला आहे की, न्यायालयात जाऊ न शकलेल्या परीक्षार्थीं विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसू देणार की नाही?

संयुक्त पूर्वपरिक्षा २०२० मध्ये झालेला गोंधळ समोर आला आहे. नुकतीच उच्च न्यायालयाने (Bombay High Court) ८६ विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेला बसण्याची परवानगी दिली.

या प्रश्नाकडे लक्ष वेधतांना आमदार पडळकर (BJP MLC Gopichand Padalkar) म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत सुधारली आहे, आणि ते आता सक्रीय झाले, हे ऐकून मला आनंद झाला. म्हणूनच मी आज जवळपास साडे तीन हजार एमपीएससी (MPCC students) देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आपले लक्ष वेधतोय.

“ज्या 86 विद्यार्थ्यांना न्यायालयाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली आहे, त्यांनाच बसू देणार आहात का? उर्वरित विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे उच्च न्यायालयाचा दरवाचा ठोठावू शकले नाही. मग त्यांना न्याय मिळणार नाही का?” असे प्रश्न उपस्थित करून आमदार पडळकर यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले की यामुळेच त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय.

अशा विद्यार्थ्यांचा राज्य सरकारने त्वरीत विचार करावा अशी मागणी करतांना वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणाले, “मला सरकारला हे सांगायचं की, एम्पीएसस्सीने प्रश्नपत्रिका व उत्तर तालिकेत गोंधळ घातला आहे. हे उच्च न्यायलयात सिद्ध झाले आहे. याची दखल घेत राज्य सरकारने एमपीएससीला संपूर्ण विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊन त्वरित कारवाई करण्याचे आदेश द्यावेत.”

पडळकर यांनी इशारा दिला की, अन्यथा यात एखाद्याने स्वप्नील लोणकरसारखे (Swapnil Lonkar) पाऊल उचलले तर याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल.

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्या, “हायकोर्टातून ८६ विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. परंतु, हजारो विद्यार्थी अजूनही प्रतिक्षेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी लक्ष घालून सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा संधी द्यावी. विद्यार्थ्यांचं वाटोळं करू नका”.

“प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा होत असताना पोलिसांनी आंदोलनाला बसलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज (lathicharge) केला आहे, याकडे लक्ष वेधून चित्रा वाघ म्हणाल्या, “हे मराठी विद्यार्थी आहेत दहशतवादी (militant) नाहीत. मुळात आयोगाच्या घोडचुकीनं मुलांवर अन्याय झाला आहे. आता लाठीचार्जचं फर्मान दिले आहे.”

“राज्याला मुख्यमंत्री नाही तुघलक मिळालाय,” अशा शब्दात चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here