@maharashtracity

मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा इतिहास घराघरात पोहोचविणारे शिवशाही बाबासाहेब पुरंदरे (Shiv Shahir Babasaheb Purandare) यांचे कलादालन दादर, शिवाजी पार्क येथील संयुक्त महाराष्ट्र कलादालनाच्या पहिल्या मजल्यावर उभारण्यात यावे, अशी मागणी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे (BJP group leader Prabhakar Shinde) यांनी केली आहे.

याबाबत त्यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचारित्र्याबाबत केलेले अभूतपूर्व लिखाण, संशोधन याची माहिती पुढच्या पिढीला होणे गरजेचे आहे. यासाठीच त्यांचे कलादालन उभारण्यात यावे, असे भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी म्हटले आहे.

शिंदे म्हणाले, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे १५ नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले. मात्र त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या लिखाणाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यांच्या कार्याची आठवण कायम मनात राहिली पाहिजे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांचे कार्य हे स्मरणात चिरंतर राहणार आहे.

त्यांनी केलेलं विपुल लेखन, साहित्य व ऐतिहासिक संशोधन हे पुढच्या पिढीला उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे दादर शिवाजी पार्क येथील संयुक्त महाराष्ट्र कलादालनात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे कलादालन (Art Gallery) पहिल्या मजल्यावर उभारावे, अशी मागणी महापौरांकडे करण्यात आली आहे, असे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here