@maharashtracity

मुंबई: कुठलेही नेतृत्व नसतानाही एस टी कर्मचाऱ्यांनी (ST workers) राज्य शासनात विलीनीकरण करा या मागणीसाठी एकजूट दाखवून संप सुरू ठेवला आहे, याबद्दल भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडाळकर (BJP MLC Gopichand Padalkar) यांनी संपकरी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

पडळकर म्हणाले, “तुम्ही कुठल्याही युनियनची सभासद फी भरली नाही. संप (Strike) करून एस टी महामंडळाच्या महसूलात घट आणली. त्यामुळेच शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्या सोबत चर्चा करण्यास भाग पाडल.”

पडळकर म्हणाले, मला मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना विनंती करायची की आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात. त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत?”

अनिल परब यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना स्वतः भेटावं आणि त्यांना ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल. त्यानंतरच चर्चेचा मार्ग मोकळा होईल, असे पडळकर म्हणाले.

त्यांनी आठवण करून दिली की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले होतेच की ते त्यांच्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगतील.

‘माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या (Maharashtra) जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा, चर्चा करा आणि यावर तोडगा काढा, असे आवाहन भाजप आमदार पडळकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here