भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांचा विधनसभेत गंभीर आरोप

मुंबई: युरोपियन युनियनसह (European Union) जगातील अनेक देशांनी घोटाळेबाज म्हणून घोषीत केलेल्या आणि पनामा पेपर्समध्य (Panama papers) नाव आलेल्या पाकिस्तानी (Pakistani Agent) एजन्टचा पैसा असलेल्या कंपनीला मुंबईच्या बेस्टच्या ई-बसचे (e-buses) कंत्राट देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी आज विधानसभेत केला.

याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातून (Maharashtra) १ हजार कोटींचे बांबू जंगल गायब झाले, तसेच माहूल (Mahul) येथील पर्यावरणाच्या विषयात सरकारने प्रदुषण (Pollution) करणाऱ्या कंपन्यांना अप्रत्यक्ष मदत कशी केली, याबाबतची माहिती उघड करून विधानसभेत खळबळ उडवून दिली.

विधानसभेमध्ये अर्थसंकल्पाच्या (budget session) विभागवार चर्चेला सुरूवात झाली. या चर्चेत सहभागी होताना आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पर्यावरण विभागाच्या कामावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, नुकताच बेस्टच्या (BEST) ताफ्यामध्ये नव्या ई- बस (e-buses) घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बसचे पहिले टेंडर हे केवळ २०० बससाठी काढण्यात आले होते. शिवाय पुन्हा बसची संख्या वाढवून ती ९०० करण्यात आली. पुन्हा यामध्ये वाढ करुन ही संख्या १४०० करण्यात आली.

मुंबईतील रस्त्यावर चाचणी न घेता एवढया बस घेण्याचा निर्णय किती योग्य की अयोग्य हा वेगळा विषय आहे, असे सांगून आज यावर मी बोलणार नाही असे म्हणत आमदार शेलार यांनी हा व्यवहार ज्या कंपनीशी करण्यात आला, त्या व्यवहारावर गंभीर स्वरूपात बोट ठेवण्याचे काम आमदार शेलार यांनी केले.

आमदार शेलार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, बेस्टसाठी १४०० बस कॉसीस ई- मोबिलिटी या परदेशी कंपनीकडून घेण्याचा निर्णय करण्यात आला असून राज्य शासनाने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या उपस्थितीत याबाबतचा करार १ आक्टोबर २०२१ रोजी करण्यात आला.

“या कंपनीला २ हजार ८०० कोटी रूपये देण्याचे मान्य करण्यात आले. या कंपनीचा सीईओ हा व कॅनडातील नागरीक असून त्याचे नाव तुमुलूरी असे आहे. हा तुमलुरी म्हणजे जागतिक पातळीवर घोटाळेबाज म्हणून घोषीत असून ज्याप्रमाणे भारताने निरव मोदीला (Nirav Modi) घोटाळेबाज म्हणून घोषीत केले आहे त्याप्रमाणे हा तुमलुरी असून त्याला युरिपेयन युनियनसह माल्टा, कॅनडा यांनी हजारो कोंटीच्या घोटाळ्यात फरार व मुख्य आरोपी म्हणून घोषीत केले आहे,” असे शेलार यांनी सभागृहात सांगितले.

तुलुमुरी याच्यावर या विविध देशामध्ये विविध ठिकाणी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असून त्यावर कॅनडाच्‍या सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा गंभीर ताशेरे कसे ओढले आहेत हे सुध्दा आमदार शेलार यांनी वाचून दाखवत या व्यक्तीच्या गुन्ह्यांबाबतचा एक सविस्तर अहवालच त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सादर केला.

शेलार यांनी दावा केला की, या कॉसिस इ- मोबिलिटी कंपनीमध्ये दोन मोठया गुंतवणुकदारांचे पैसे असून त्यांची नाव पनामा पेपरमध्ये जाहीर झाली होती. यातील शौकत अली अब्दुल गफूर हा पाकिस्तानी एजन्ट असून तो लिबियामध्ये काम करतो (या व्‍यक्‍तीचे परवेज मुशरफ सोबतचे फोटो ही दाखविले). तो हवाला रॅकेट चालवण्याचे काम करतो आणि तो शस्त्र पुरवठादार आहे, अशीही माहिती शेलार यांनी सभागृहाला दिली.

याच कंपनीमध्ये अन्य एका माणसाची गुंतवणूक आहे. त्याचे नाव असद अली शौकत असून हा पाकिस्तानी असून तो दुबईमध्ये राहतो. हा सुध्दा हवाला रॅकेट चालवणारा असून यांची गुंतवणूक असलेल्या कंपनीकडून महाराष्ट्र सरकर बेस्टसाठी ई बस घेण्यासाठी का गेले, त्यांनाच हे कंत्राट का देण्यात आले असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here