@maharashtracity
मुंबई: भाजपा ओबीसी मोर्चा (BJP OBC Morcha) राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची पक्षाकडून आज घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय कार्यकारिणीत भाजपा मुंबई सचिव व शिक्षण समिती सदस्य प्रतिक कर्पे (Pratik Karpe) यांना स्थान देण्यात आले आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यांची घोषणा करण्यात आली असून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.
यात भाजपा मुंबई सचिव व शिक्षण समिती सदस्य प्रतिक कर्पे यांची निवड करण्यात आली आहे. प्रतिक कर्पे व्यवसायाने चार्टड अकाउन्टट आहेत.
“भाजपा ओबीसी मोर्चा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पदी माझी निवड करण्यात आली. पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थकी लावीन. तसेच पक्षाने आखून दिलेल्या ध्येयधोरणांप्रमाणे तळागाळाच्या कार्यकर्त्यापासून ते नागरिकांपर्यत पोहचत पक्ष बळकटीसाठी व राष्ट्रीय विचारधारेसाठी , हिंदूत्वासाठी सदैव तत्पर असेन.”
- प्रतिक कर्पे