Twitter : @maharashtracity

मुंबई: संपूर्ण राज्यात ‘मामा” या टोपण नावाने ओळखले जाणारे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या मध्य प्रदेशात उच्चवर्णीय जातीच्या तरुणाकडून एका मागास जातीतील तरुणाची अत्यंत अपमानास्पदरित्या विटंबना करण्यात आली. दलित वॉइस या ट्वीटर अकाऊंटने या संदर्भातील विडियो प्रसारित केल्याने त्या उच्चवर्णीय तरुणासह विडियो रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तिविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

मध्य प्रदेशात नेमक्या कोणत्या शहरात किंवा गावात ही घटना घडली याचा उल्लेख समाज मध्यमावर नाही. मात्र, या उच्चवर्णीय तरुणाचे नाव प्रवेश शुक्ला असून तो भारतीय जनता पक्षाचा स्थानिक पदाधिकारी असल्याचे सांगितले जात आहे. हा युवक दलित समाजातील एका तरुणाच्या अंगावर मूत्र विसर्जन करत असल्याचे विडियो मध्ये दिसत आहे. हा प्रवेश शुक्ला सिधी मतदार संघातील भाजपचा विधायक प्रतिनिधी आहे.

ज्या तरुणांची विटंबना झाली तो दलित असल्याचा दावा काही लोक करत आहेत तर अन्य काही व्यक्ति तो आदिवासी असल्याचे म्हणत आहेत. मात्र, या विडियोच्या पोस्ट च्या खाली सगळ्याच थरातून प्रचंड निषेध व्यक्त केला जात असून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here