ट्विटवरुन दिली माहिती

@maharashtracity

मुंबई: मुंबईसह राज्यात दैनंदिन कोरोनारुग्ण वाढत आहेत. असे असताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोना बाधा झाली असल्याचे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच ट्विट करुन दिली.

“मला कोरोनाची बाधा झाली असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी औषध घेत आहे. सध्या मी विलगीकरणात (home isolation) आहे. जे कोणी माझ्या संपर्कात आलेले आहेत, त्यांनीसुद्धा कोरोना चाचणी करून घ्यावी, सगळ्यांनी काळजी घ्यावी, असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

फडणवीस यांना कोरोना होण्याची ही दुसरी वेळ असून दोन वर्षांपूर्वीसुद्धा त्यांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यावेळी त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केले होते. दरम्यान, फडणसवीस यांना पुन्हा कोरोना बाधा झाली असली तरीही फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकांसाठी अश्विनी वैष्णव यांच्या सोबत बैठकीत ऑनलाईन उपस्थिती लावली असल्याचेही समजत आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे शनिवारी लातूरचा दौरा आटोपून सोलापूरच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, ताप आल्याने दौरा अर्धवट सोडून ते मुंबईकडे वळले. रविवारी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. कोरोना झाल्यानंतर सात दिवस क्वारंटाईन राहावे लागते. त्याप्रमाणे राज्यसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस कसे उपस्थित राहणार हाच प्रश्न आता राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.

दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीनंतरही कोरोना बाधा

दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त २५ मे रोजी झालेल्या यशराज स्टुडीओमधील पार्टीदेखील कोरोना स्प्रेडर ठरत असल्याचे समजत आहे. या पार्टीत ५५ सिलेब्रेटी सहभागी झाले होते. यातील अभिनेत्री कतरीना कैफ (Katrina Kaif) हिचा कोविड टेस्ट अहवाल १ तारखेला पॉझिटीव्ह आला. तर कलाकार कार्तिक आर्यंन (Kartik Aryan) याला बाधा झाल्याचे ४ जून रोजी समजले. यापूर्वी अशा पार्ट्या कोविड सुपर स्प्रेडर (covid super spreader) ठरल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here