Twitter : @vivekbhavsar

मुंबई

संभाजी भिडे ही यांच्यासाठी (भारतीय जनता पक्ष) गुरुजीच आहेत, ते हिंदुत्वासाठी काम करतात आणि ते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या किल्ल्यांशी बहुजन समाजाला जोडतात, हे त्यांचे कार्य चांगले आहे, अशा शब्दात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांची आज विधान सभेत पाठराखण करताना कॉँग्रेस सदस्यांच्या आरोपांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी सांगितले की, असे असले तरी संभाजी भिडे गुरुजी यांना महापुरुषाबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही, असे स्पष्ट करतानाच वीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त लिखान करणाऱ्या शिदोरी या कॉँग्रेसच्या मुखपत्रविरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी कॉंग्रेस सदस्यांना दिला.

(संभाजी भिडे ही विकृत असल्याचा उल्लेख करून बाळासाहेब थोरात यांनी या विषयाला वाचा फोडली)

कॉँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांनी भिडे यांचा विषय सभागृहात उपस्थित केला आणि चर्चेची मागणी केली. भिडे नावाचा एक विकृत मनोवृत्ती असेलेले व्यक्तिमत्व आहे, असे वक्तव्य करताच अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना थांबवले. शुक्रवारी पृथ्वीराज चव्हाण आणि कोंग्रेस सदस्यांनी हाच प्रश्न उपस्थित केला होता, मात्र तेव्हाही हा स्थगन आपण फेटाळला होता, आता त्यावर चर्चा होऊ शकत नाही, असे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. त्यावर सभागृहात गोंधळ झाल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केले.

फडणवीस म्हणाले, संभाजी भिडे गुरुजी यांनी अमरावती येथील एक सभेत एका पुस्तकाचा आधार घेऊन त्यांच्या सहकाऱ्याला एक परिच्छेद वाचून दाखवण्यास सांगितले आणि त्यातील आशयावरून त्यांनी काही वक्तव्य केले. ती दोन पुस्तके डॉ एस के नारायणचार्य आणि घोष यांचे आहेत आणि ते कॉँग्रेसचे नेते आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याच्या पुस्तकातील मजकूर संभाजी भिडे यांनी उदहृत केला. त्यातील एक पुस्तकाचे नाव द कुराण अँड द काफिर असून या १९२ पानाच्या पुस्तकात तसा उल्लेख असल्याचे समाज माध्यमात फिरणाऱ्या विडिओमधून दिसून येते. या प्रकरणी संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांचे दोन सहकारी यांच्या विरोधात अमरावती येथील राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.

(हेच ते वादग्रस्त द कुराण अँड द काफिर पुस्तक)

फडणवीस वारंवार संभाजी भिडे यांचा उल्लेख गुरुजी असा करत असल्याने विरोधी पक्ष सदस्यांनी हरकत घेतली असता ते आम्हाला गुरुजी वाटतात आणि त्यांचे नाव संभाजी भिडे गुरुजी आहे, असे समर्थन फडणवीस यांनी केले. त्यांनी पुढे सांगितले आय अमरावती पोलिसांनी संभाजी भिडे गुरुजी यांना नोटिस पाठवली असून त्यांनी ती स्वीकारली आहे. त्यानुसार चौकशी होईल. अमरावती येथील त्या सभेचे विडियो उपलब्ध नाहीत असे पोलिसांचे म्हणणे आहे, समाज माध्यमावर जे विडियो फिरत आहेत, ते निरनिराळ्या ठिकाणचे आहेत. त्यामुळे भिडे गुरुजू याचे आवाजाचे नमुने घेतले जातील.

फडणवीस यांनी संगीतले की जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे पोलिसात तक्रार दाखल केली आहे, ती अमरावती पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. त्या तक्रारीसोबत आव्हाड यांनी जे संदर्भ दिले आहेत, ते देखील तपासले जाणार आहेत.

कोणत्याही राष्ट्रीय पुरुषाबद्दल अवमानजनक वक्तव्य करणाऱ्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. केवळ भिडे गुरुजी यांनाच नाही तर अन्य कोणालाही महापुरुषाबद्दल असे वक्तव्य करण्याचा अधिकार दिलेला नाही, त्यांचीवर कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी सभागृहाला सांगितले.

कॉँग्रेसचे मुखपत्र असलेल्या शिदोरी या मासिकाचा उल्लेख करून देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या मासिकात वीर सावरकर यांच्या विरोधात लेखन केले जात आहे. सावरकर ही माफीवीर होते, वीर सावरकर समलैंगिक होते, वीर सावरकर स्वातंत्र्य लढ्यात नव्हते. ते म्हणाले, ज्याप्रमाणे संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्याच प्रमाणे वीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या शिदोरी मासिकावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here