@maharashtracity

धुळे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या पंजाब (Punjab) दौर्‍याप्रसंगी सुरक्षेत ढिसाळपणा केल्याबद्दल महानगर भाजपा (Dhule BJP) अनुसूचित जाती आघाडीतर्फे पंजाबमधील काँग्रेस सरकारच्या (Congress Government) भूमिकेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने (Protest) करण्यात आलीत.

या आंदोलनात भाजपा अनुसूचित जाती आघाडीचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रदीप पानपाटील, प्रदेश सरचिटणीस महेंद्र खैरनार, प्रदेश चिटणीस नागसेन बोरसे, विनायक अहिरे, मोहित चित्ते, मनुकुमार गोयर, विक्की थोरात, राज ढिवरे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, देशाचे पंतप्रधान हे दि.5 जानेवारी रोजी पंजाब दौर्‍यावर असताना त्यांना तेथील एका उड्डाणपुलावर 15 ते 20 मिनीटे थांबावे लागले. त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत ढिसाळपणा केल्याने ही घटना घडली.

ही घटना अतिशय असमर्थनीय व निंदनीय आहे. पंतप्रधानपद हे संविधानिक असून त्यांच्यासोबत असा निंदनिय प्रकार घडवून आणणे म्हणजे एक प्रकारे आपल्या संविधानाचा अपमान आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेमध्ये पंजाब सरकार यंत्रणेचा झालेला ढिसाळपणा म्हणजेच काँग्रेसने गाठलेल्या घृणास्पद वर्तणुकीचा कळस आहे. त्यामुळे आम्ही पंजाबमधील काँग्रेस सरकारचा धुळे जिल्हावासियांच्यावतीने जाहीर निषेध करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here