@maharashtracity

धुळे: धुळे जिल्हा परिषदेच्या 15 गट आणि त्याअंतर्गत असलेल्या चार पंचायत समितीच्या ३० गण यांच्या पोटनिवडणुकीसाठी दाखल अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेचा एक गट आणि पंचायत समितीचे दोन गण अशा तीन जागा बिनविरोध झाल्या असून आता जिल्हा परिषदेच्या १४ गटांसाठी ४२ तर पंचायत समितीच्या २८ गणांसाठी ७२ असे एकूण ११४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. (Three candidates elected un oppose in Dhule ZP by-election)

दरम्यान बोरकुंड गटातून भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याने, शिवसेनेच्या उमेदवार शालिनी बाळासाहेब भदाणे या बिनविरोध झाल्या आहेत. त्याची अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.

धुळे जिल्हा परिषदेच्या (Dhule ZIla Parishad) धुळे तालुक्यात ११ आणि शिंदखेडा तालुक्यातील ४ अशा एकूण १५ तर पंचायत समितीच्या धुळे तालुक्यातील ८, शिरपूर ८, साक्री ९ आणि शिंदखेडा तालुक्यातील ५ अशा ३० गणांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.

धुळे तालुक्यातील पंचायत समितीच्या ८ गणासाठी ६० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. माघारीच्या दिवशी ३८ उमेदवारांनी माघार घेतली असून, आता २२ उमेदवार रिंगणात आहेत. साक्री तालुक्यातील ९ जागांसाठी ७१ जणांनी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या दिवशी ४४ जणांनी अर्ज माघारी घेतल्याने २७ उमेदवार रिंगणात आहेत.

शिरपूर (Shirpur) तालुक्यातील ८ जागांसाठी २१ अर्ज दाखल होते. पैकी विखरण गणातून भाजपच्या विनीता पाटील आणि करवंद गणातून यतीश सोनवणे हे बिनविरोध झाल्याने आता ६ गणांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी १३ उमेदवार रिंगणात आहेत.

तसेच शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील पाच गणांसाठी २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीच्या दिवशी १५ जणानी माघार घेतली. त्यामुळे आता १० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here