आमदार गोपीचंद पडळकर यांचा संजय राऊत यांना सवाल

@maharashtracity

मुंबई: युवा सेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना उत्तर प्रदेश (UP) आणि गोवा (Goa) विधासभा निवडणुकीत प्रचाराला पाठवूनही शिवसेनेला (Shiv Sena) नोटा पेक्षा कमी मते मिळाली. यावर टीका करतांना भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर (BJP MLC Gopichand Padalkar) यांनी सेना खासदार आणि पक्ष प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर कडवट शब्दात टीका केली आहे.

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भाजपकडून (BJP) नेहमीच पप्पू या नावाने अवहेलना केली जाते. पडळकर यांनी पप्पू या नावाचा उल्लेख न करता संजय राऊत यांना खोचक सवाल केला आहे की राऊत हे आदित्य ठाकरे यांना देश पातळीवर लाँच करून राहुल गांधी यांना जे टोपण मिळाले आहे, तसेच आदित्य यांना मिळवून द्यायचे आहे का? भाजप आमदार पडळकर यांनी राऊत यांचा उल्लेख जनाब राऊत असा केला आहे.

काश्मीरमधील 1990 मधील लाल चौकातील (Lal Chowk, Kashmir) आंदोलनाची आठवण करून देतांना गोपीचंद पडळकर म्हणाले, “जनाब राऊत, तुमच्या माहिती करता सांगतो, जेंव्हा लाल चौकात पाक आंतकवाद्यांनी कोई मा का लाल तिरंगा लहराके दिखाये अशा धमक्या देणारे पोस्टर्स लावले होते, त्यावेळी नरेंद्र मोदीजी (Narendra Modi) यांनी दहशतवाद्यांच्या धमक्यांना न जुमनता लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवला होता.”

कृषी पंपधारक शेतकऱ्यांची वीज जोडणी कापली जात असल्याबद्दल पडळकर म्हणाले, जनाब राऊत उर्जामंत्र्यांच्या आश्वासनानंतरसुद्धा शेतकऱ्यांची वीज कापली जात आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतोय. यावर कधीतरी एखादा लेख लिहा.

“माझ्यासारखी कुठलीही सुरक्षा न स्वीकारता महाराष्ट्रात फिरवून दाखवा.. म्हणजे शेतकऱ्यांचे तुमच्यावर किती प्रेम आहे, याची तुम्हाला खरी प्रचिती येईल”, असे आव्हान गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांना दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here