मनसे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

मुंबई: घुसखोर (encrocher) पाकिस्तानी (Pakistani) आणि बांगलादेशी (Bangladeshi) यांना हाकललेच पाहिजे हीच भूमिका मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची असेल तर त्यांनी ‘मातोश्री’च्या (Matoshree) आसपास बस्तान बसवलेल्या घुसखोरांना आधी हुसकावून लावण्याची हिम्मत दाखवावी, असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) उपाध्यक्ष अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी दिले आहे.

चित्रे यांनी thenews21 शी बोलतांना शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या आक्रमक आणि रोखठोक भूमिकेची आठवण करून दिली. चित्रे म्हणाले, “घुसखोरांचा विषय पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांनीच मांडला होता. आज तोच विचार आणि लढा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे पुढे ( Raj Thackeray) घेऊन जात आहेत.”

घुसखोरांना हाकलण्याचा विषय हा श्रेयवादाचा नाही, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्षात घेतले पाहिजे, असेही चित्रे यांनी सांगितले. त्यासाठीच ९ फेब्रुवारीला पाकिस्तानी-बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात मनसेचा महामोर्चा असेल, असे चित्रे यांनी स्पष्ट केले.

“बाळासाहेबांनीच मराठीचा, स्थानिक मराठी तरुणांचा आणि घुसखोऱ्यांना हाकलण्याच्या मुद्यांना प्राधान्य दिलं होतं. आज याच मुद्यांचा विचार घेऊन राज ठाकरे पुढे जात आहेत. बाळासाहेबांनी घुसखोरांच्या विरोधात नेहमीच आक्रमक भूमिका मांडली होती. आता सत्तेत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हेच विचार पुढे नेण्यास आम्हाला सहकार्य करावे. याच गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी ‘मातोश्री’बाहेर बॅनर लावले आहेत,” असे चित्र यांनी स्पष्ट केले.

घुसखोर पाकिस्तानी-बांग्लादेशींना देशातून हाकलंलच पाहीजे, हीच मुख्यमंत्री म्हणून आपली देखील भूमिका असेल तर पदाचा आणि सत्तेचा वापर करून आपल्याच अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करा, अशा तीव्र शब्दांत मनसैनिकांच्यावतीने चित्रे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

बांग्लादेशी मुस्लिमांना मनसे करणार टार्गेट

मुंबईतील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून परप्रांतीयांमुळे इथल्या प्रशासनावर ताण पडतोय. त्यातही बांग्लादेशी मुस्लिमांमुळे (Muslim) येथील वातावरण दूषित होत असल्याचे राज ठाकरे नेहमीच सांगत आले आहेत. परराज्यातून आलेल्या घुसखोरांचा विषयही राज ठाकरे यांनी सातत्याने लावून धरला आहे. त्यासाठीच, ९ फेब्रुवारीच्या मोर्चात बांग्लादेशी मुस्लिम घोसखोरांच्या मुद्यावर मनसैनिक आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here