By Anant Nalavade

Twitter: @nalavadeanant

मुंबई: राज्याची आर्थिक परिस्थिती सक्षम असून उद्योग वाढीसाठी पूरक वातावरण आहे. त्यामूळे नविनीकरण (Renewable power) उर्जा क्षेत्रात उद्योग वाढीसाठी लागणारे सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी येथे दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे मे. रिन्यू पॉवर लि. आणि उद्योग विभाग यांच्यात सामंजस्य करार झाला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि रिन्यू पॉवर प्रा.लि.चे डॉ. अमित पैठणकर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यात अनेक मोठे प्रकल्प येत आहेत. त्याचप्रमाणे इथे आलेले अनेक प्रकल्प अल्पावधीतच मोठे झाले आहेत. कारण उद्योग वाढीसाठी लागणारे पूरक वातावरण राज्यात उपलब्ध आहे. आर्थिक परिस्थिती कोविड काळातही स्थिर होती. रिन्यु पॉवर या कंपनीचा प्रस्तावित प्रकल्प हा नागपूरात येत असल्याने विशेष सहकार्य करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी येथे नमूद केले.

उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांनी उद्योग विभागाच्या प्रयत्नाने होत असलेल्या या सामंजस्य कराराचे विशेष स्वागत केले. या सामजंस्य कराराच्या माध्यमातून नविनीकरणीय उर्जा क्षेत्रात एका नव्या पर्वाला सुरुवात होणार असल्याचा विश्वास सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

२० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित

दिल्ली स्थित रिन्यू पॉवर लि. घटकामार्फत १० गिगावॅट मेटाल्युर्जिकल ग्रेड सिलिका, १० गिगावॅट पॉलिसिलीकॉन, ६ गिगावॅट इनगॉट/वेफर निर्मिती सुविधा आणि १ गिगावॅट मॉड्युल निर्मितीची सुविधा नवीकरणीय ऊर्जा ब्लॉकसह एकात्मिक प्रकल्प स्थापित करणार आहे.

हा प्रकल्प नागपूर येथे सुमारे ५०० एकर जागेवर स्थापित होणार आहे. प्रस्तावित प्रकल्पात २०,००० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ८,००० ते १०,००० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. प्रकल्प उभारल्यानंतर प्रकल्पाशी संबंधित असलेल्या उद्योगांच्या (Ancillary Unit) माध्यमातून २००० कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूकही होणार आहे.

यावेळी उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मलिकनेर, मे. रिन्यू पॉवर प्रा. लि.चे प्रमुख तांत्रिक अधिकारी सर्वनंट सेण्ट, मुख्य कार्यकारी अधिकारी मार्कम सिकमोक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here