@maharashtracity

लांजा: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबाबत मुख्यमंत्र्यांचे अज्ञान उघड केले म्हणून एवढा मोठा थयथयाट केलात का? असा सवाल करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी हम किसी को छेडेंगे नहीं, कोई हमको छेड़ेगा तो उसको छोड़ेंगे नहीं, असा इशारा ही दिला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या (Jan Ashirwad Rally) निमित्ताने आज लांजा येथे संवाद सभा झाली. यावेळी बोलताना भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray government) जोरदार टीका केली.

मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि शिवसेनेने (Shiv Sena) केलेला तमाशा याचे खरे कारण काय होते? मुख्यमंत्र्यांचे अज्ञान राणें यांनी उघड केले म्हणून एवढा राग आला का?

याच महिन्यात मंत्रालयासमोर सुभाष जाधव या शेतकऱ्यांने आत्महत्या केली. तर इंदापूरचे शिवाजी चितळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्या यांच्या सभेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

तर पालघर मध्ये आदिवासी काळू पवार याने पाचशे रुपयाचे मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी कर्ज घेतले त्या प्रकरणी छळ झाला म्हणून आत्महत्या केली. या घटनांतून राज्य सरकारविषयी असलेला असंतोष प्रकट होऊ लागला आहे. या घटनांवरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी राणे यांना अटक व त्यानिमित्ताने हिंसक घटना घडविल्या जात असाव्यात असा संशय येतो , असेही आ. शेलार यांनी सांगितले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजनांचा उहापोह ही त्यांनी आपल्या भाषणात केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here