@maharashtracity

शहापूर: ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून मदतीचे वाटप करण्याच्या सूचना नगरविकास तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे (guardian minister Eknath Shinde) यांनी दिले आहेत. 

गेल्या आठवड्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा नदीपात्राजवळील काही गावांना मोठा फटका बसला होता. या भागाचा दौरा करून त्यांनी येथील परिस्थितिची पाहणी केली.  

गेल्या आठवड्यात राज्यात झालेल्या पुराचा तडाखा जसा कोकण (Konkan) आणि पश्चिम महाराष्ट्राला (Western Maharashtra) बसला तसाच तो ठाणे जिल्ह्यातील शहापूर (Shahapur) तालुक्याला देखील बसला. यावेळी नदीपात्राजवळ वसलेल्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या गावाचे अतोनात नुकसान झाले. या पूरग्रस्त भागांचे पंचनामे तताडीने पूर्ण करण्यास सांगून त्याना मदत म्हणून अन्नधान्यांचे किट्सचे, सतरंज्या, चादरी, कपडे यांचे  वाटप करण्यात आले. तालुक्यातील चरिव, आल्याणी या गावांना पालकमंत्री शिंदे यांनी यावेळी भेट दिली. 

माळशेज घाटात झालेला मुसळधार पावसामुळे नद्यांची पात्र वेगाने फुगली. त्यामुळे या गावातील पाणीपातळी वेगाने वाढली. त्याचा फटका या गावांना बसला. या गावांना असलेला धोका लक्षात घेऊन त्यांचे पुनर्वसन (rehabilitation) करण्याबाबत देखील शासन निश्चितच प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here