@maharashtracity

धुळे: ओ बी सी प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भूमिका मांडू द्यावी अशी मागणी करणे काही गैर नाही. विधानसभेचे सभागृह हे तेथे निवडुन आलेल्या सदस्यांचे हक्काचे व्यासपीठ असते. परंतु सत्ताधारी गटाने मुस्कटदाबी करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलू दिले नाही म्हणून त्याचा जाब विचारत असताना आमदार जयकुमार रावल यांच्यासह १२ आमदारांचे निलंबन करून सरकारने भाजपचे संख्याबळ कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या निषेधार्थ धुळे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्यावतीने जिल्हाध्यक्ष नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोंडाईचा येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ठाकरे सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी सेना आमदार भास्कर जाधव यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्याची प्रतिमा जाळून निषेध नोंदवला.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा सरचिटणीस डी एस गिरासे, शहराध्यक्ष प्रवीण महाजन, सरचिटणीस कृष्णा नगराळे, बांधकाम सभापती निखिल राजपुत, नगरसेवक भरतरी ठाकुर, भाजपाचे सरचिटणीस पंकज चौधरी, अनिल सिसोदिया, श्रीकांत श्राॅफ, नरेंद्र बाविस्कर, महेंद्र गिरासे, भैय्या धनगर, कालु धनगर, जितेंद्र गिरासे, खालील बागवान, जलील बागवान,महेंद्र गिरासे, आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here