@maharashtracity

विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकरांचा अंतिम आठवडा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा (Law and Order) पुरता बोजवारा उडाला असून एकही घटक सुरक्षित नसल्याची टीका विधान विरोधी पक्ष नेता प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी सोमवारी विधान परिषद सभागृहात केली.

राज्यात महिला, मुली सुरक्षित नसून राज्याला अंमली पदार्थाचा विळखा पडला आहे. मात्र सरकार खंडणीमध्ये (Extortion) व्यस्त असल्याने एकही घटक सुरक्षित नाही. तर बेकायदा ऑनलाईन लॉटरी (illegal online lottery) व गेमिंगमुळे युवा पिढी उध्दवस्त होत असल्याचा आरोप अंतिम आठवडा प्रस्तावातून केला.

दरम्यान, सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारच्या वचननाम्यात महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे वचन देण्यात आले. पण गेल्या दोन वर्षाच्या काळात राज्यातील महिला सर्वांत असुरक्षित (Women unsafe) असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला.

महिलांसाठी असलेल्या मनोधैर्य योजनेसाठी सरकारने एक दमडीचीही तरतूद केलेली नाही. मात्र, विदेशी दारुवरील कर माफ सरकारने केला. यातून सरकार महिलांचे मनोधैर्य उंचावण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करीत आहे, असा आरोप दरेकर यांनी केला.

मनोधैर्य योजनेसाठी 2020 आणि 2021 मध्ये सरकारने योजनेसाठी एक रुपयाचा निधी दिला नाही. 2019 मध्ये 30 हजार रुपयांची प्राथमिक मदत 638 आणि 2020 मध्ये 599 पीडितांना दिली. पुढील 75 टक्के मदत अजूनही पिडितांना मिळालेली नाही असेही दरेकर यांनी सभागृहाच्या निर्दशनास आणून दिली.

राज्याला अंमली पदार्थाचा विळखा बसला आहे. तर राज्यात सुरु असलेली बेकायदा ऑनलाईन लॉटरी व गेमिंगमुळे युवा पिढी उध्दवस्त होण्याच्या मार्गावर असल्याची घणाघाती टिका दरेकर यांनी केली.

राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेमुळे, हत्या, अपहरण, दरोडे, घरफोड्या यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. गृहविभागाला या घटनांना आळा घालण्यात अपयश आहे आहे.

गृह विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे, अंमली पदार्थ, गुटखा व्यापार, जुगार, मटका या अवैध धंद्यात वाढ झाली आहे, अल्पवयीन मुले, मुली व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये झाली असून काही प्रकरणांमध्ये क्रुरतेने कळस गाठला असल्याचे दरेकर म्हणाले.

मुंबई व एमएमआरडीए (MMRDA) क्षेत्रातील रखडलेल्या विविध प्रकल्पामधील दिंरगाई, तसेच मुंबई महानगरपालिकेचे रखडलेले प्रकल्प, रस्ते, नालेसाफाई, यामध्ये झालेला गैरव्यहार तसेच मुंबई मेट्रोची रखडलेले कामे आदि विषयावंर दरेकर यांनी सविस्तर आकडेवारी सादर करीत या सर्व विषयांवर सरकारने वस्तुस्थिती सादर करण्याचे आवाहनही दरेकर यांनी केले.

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण सध्या वाढत असून, पुणे, नागपूर, नाशिक यासारख्या शहरात संघटित गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे, वाळू माफियांकडून व अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही.

तसेच मागासवर्गीय समाजावर होणारे हल्ले व त्यांच्यात असुरक्षिततेची भावना वाढतेय, जातीय हिंसाचार व दंगलींचे प्रमाणही या सरकारच्या कारकिर्दीत वाढले.

वन-रुपी क्लिनिकसारख्या (One Rupee Clinic) दिखाऊ घोषणा देण्यात आल्या. मात्र एक क्लिनिक मुंबईत दिसत नाही, त्यामुळे आणखी किती काळ मुंबईकरांची फसवणूक करणार असा सवालही दरेकर यांनी यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here