@maharashtracity

धुळे: धुळे महापालिकेच्या (DMC) महापौर पदाची निवडणुक (Mayoral Election) दि. १७ रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) सर्व ५० नगरसेवकांनी प्रदीप कर्पे यांना मतदान करावे, यासाठी भाजपच्या गटनेत्या वालीबेन मंडोरे यांनी पक्षादेश अर्थात व्हीप (Whip) बजावला आहे.

जळगाव महापालिकेतील (Jalgaon Corporation) सत्ता पालटाचा अनुभव आलेल्या भाजपने धुळे महपालिका महापौर निवडीच्या पार्श्‍वभुमीवर सावधगिरी बाळगली आहे. नाराज नगरसेवकांचा गट तयार होवून त्यांनी दगा फटका करु नये, यासाठी पक्षाने आधिच खबरदारी घेतली आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापुर्वीच सर्व नगरसेवकांना समुद्र किनारी सहलींसाठी रवाना केले. त्यानंतरही अंतर्गत नाराजी उद्भवू नये यासाठी महापालिकेतील भाजपच्या गटनेत्या नगरसेविका वालिबेन मंडोरे यांनी पक्षादेश जारी केला आहे.

भारतीय जनता पक्षाने महापौर पदासाठी अधिकृतरित्या प्रदीप बाळासाहेब कर्पे (Nana Karpe) यांचे नाव निश्‍चीत केलेले असून त्यांना अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे सर्व ५० नगरसेवकांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रदीप कर्पे यांना ऑनलाईन पध्दतीने मतदान करावे.

पक्ष आदेशाचे पालन न केल्यास नगरसेवकांविरुध्द महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण अनर्हता अधिनियम १९८६ व नियम १९८७ मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे या व्हीपमध्ये नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here