@maharashtracity

खासदारांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्याची मागणी

धुळे: एमआयएमचे प्रमुख खा.असदुद्दीन ओवेसी (MIM MP Asaduddin Owaisi) यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी धुळे शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर एमआयएम पक्षाच्या आमदारांनी मोर्चा काढला. यावेळी खा.ओवेसी यांना झेड प्लस सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी एमआयएमचे धुळे शहराचे आ. फारूक शाह (MLA Faruk Shah) केली आहे.

धुळे शहरातील 80 फुटी रस्त्यावरील आ. शाह यांच्या कार्यालयापासून गुरुवारी मूक मोर्चा काढण्यात आला. तो लोकमान्य हॉस्पिटल, बारापत्थर, मनपाची नवी इमारत या मार्गाने क्युमाईन क्लबजवळ पोहोचला. या मोर्चात एमआयएमचे आ.फारुक शाह यांच्यासह नगरसेवक युसूफ मुल्ला, सईद बेग, नासीप पठाण, गनी डॉलर, महिला जिल्हाध्यक्षा डॉ.दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी, वसीम आक्रम आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

यानंतर आ. शाह यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, दि. 3 रोजी उत्तर प्रदेशातील मेरठजवळ (Merath, Uttar Pradesh) खा. असदुद्दीन ओवेसी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. जातीयवादी आणि धर्मांध शक्तींनी हा भ्याड हल्ला केला असून त्याचा आम्ही करीत आहोत. उत्तर प्रदेशची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केवळ राजकीय हेतूने हा हल्ला करण्यात आल्याचे स्पष्ट आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपाच्या (BJP) पायाखालची वाळू सरकू लागली आहे. एका बाजुला विकासाच्या घोषणा देणार्‍या सत्ताधार्‍यांना निवडणूका जिंकण्यासाठी हिंसेचा आधार घ्यावा लागतो आहे. हल्लेखोरांना कठोर शासन करावे. तसेच खा.ओवेसींना झेड प्लस सुरक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here