मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

By Anant Nalavade

Twitter : @nalavadeanant

मुंबई: मुंबईतील चर्चगेट परिसरातील मुलींच्या शासकीय वसतिगृहात १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह काल आढळून आला होता. मुलीची हत्या करून खोलीत कोंडून ठेवले आणि खोलीला बाहेरून कुलूप लावून आरोपी पळून गेला. मुलीच्या गळ्यात स्कार्फ गुंडाळला होता. या मुलीसोबत बलात्कार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, या घटनेवरून राज्य सरकारही अलर्ट मोडवर आले असून राज्यातील सर्व शासकीय वसतीगृहांची सुरक्षा तपासणीचे आदेश सरकारने दिले आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी येथे एका विशेष बैठकीत हे आदेश दिले आहेत. तसेच याप्रकरणी उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची स्थापन करण्यात आली असून एका आठवड्यात सर्व शासकीय वसतीगृहांचे ऑडिट करण्याचा सुचनाही देण्यात आल्या आहेत. १४ जून २०२३ पर्यंत अहवाल सादर करण्याच्या सुचनाही पाटील यांनी दिल्या आहेत.

बलात्कारानंतर मुलीची हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. वसतिगृहात काम करणारा तरुण हत्येनंतर फरार झाला आहे. त्याचा मृतदेह देखील सापडला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here