निरीक्षणासाठी २४ तास आयसीयूत ठेवणार
@maharashtracity
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (mla nawab malik) सकाळी १० वाजता मलिक यांना पोटदुखीच्या त्रासामुळे जे जे रुग्णालयात (JJ hospital) दाखल करण्यात आले. दरम्यानच्या काळात आवश्यक त्या सर्व तपासण्या आणि चाचण्या करण्यात आल्या असून त्यांचे ब्लड प्रेशर नियंत्रणात येत नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सद्यस्थितीत त्यांना पुढचे २४ तास निरीक्षणासाठी आयसीयूत दाखल केले गेले आहेत. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातर्फे देण्यात आली आहे.
मलिक यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून आज त्यांना स्ट्रेचरवरून जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मलिक तीन दिवसांपासून खूप आजारी आहेत, अशी माहिती मलिक यांच्या वकिलांची विशेष पीएमएलए कोर्टात दिली आहे असंही सांगितले जात आहे.
याशिवाय, त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात येईल असेही सांगण्यात येत आहे.
सोमवारी दुपारी कारागृहात कथितरित्या कोसळल्यानंतर मंत्री यांना जेजे रुग्णालयात हलवण्यात आले असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. मलिक यांचे वकील यांनी मलिक यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी केली.