@maharashtracity

राष्ट्रवादीतर्फे महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक

धुळे: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक शब्द वापरणार्‍या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेतर्फे (Shiv Sena) निषेध करत त्यांचे छायाचित्र असलेले पत्रके जाळण्यात आले. तर राष्ट्रवादीतर्फे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. (Shiv Sena condems Karnataka CM)

शहरातील नकाणेरोडवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई (Karnataka CM Basavaraj Bommai) यांचे छायाचित्र असलेले पत्रके जाळून निषेध व्यक्त केला. या वेळी शिवसेना महानगर प्रमुख सतिष महाले, मनोज मोरे, गुलाब माळी, धीरज पाटील, रामदास कानकाटे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील (Jayant Patil) यांच्या आदेशानुसार शहरातील बारा पत्थर चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj statue) पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात आला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Also Read: हमाल-महिला कामगारांची बेकायदेशीरपणे नोंदणी केल्यास न्यायालयात जाणार

तसेच कर्नाटकातील भाजप सरकारचा (BJP government) निषेध करण्यात आला. यावेळी धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले, राजेंद्र चितोडकर, जावेद मण्यार, असलम खाटीक, सरोज कदम, करुणा पाटील, निखिल मोनिया, महेंद्र शिरसाट, राजेंद्र चौधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here