पक्ष फुटीच्या भीतीने भाजपणे ऐनवेळी बदलला उमेदवार?

मुंबई: महाराष्ट्र (Maharashtra) विधनापरिषदेची (Upper House) निवडणूक असंख्य कारणांनी गाजली. त्यातील प्रमुख कारण होते, मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) त्या पदावर राहणार की नाही आणि दुसरे कारण होते, भाजपमधील (BJP) अंर्तगत बंडाळी (rebel). निवडणूक पश्चात भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि माजी मंत्री प्रा राम शिंदे (Prof Ram Shinde) यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. तर समर्थकाला तिकीट मिळाल्याने पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी अखेर मौन बाळगणे पसंत केले. मिळालेल्या माहितीनुसार, या विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या 23 आमदारांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ अजित गोपचडे (Dr Ajeet Gopchade) यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवल्याने भाजपने शेवटच्या क्षणी उमेदवार बदलला अशी भाजपात चर्चा आहे.

भाजपचे गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), प्रवीण दटके (Praveen Datake), रणजितसिंह मोहिते-पाटील (Ranjitsinhji Mohite-Patil) आणि रमेश कराड (Ramesh Karad) हे चार उमेदवार बिनविरोध निवडून आले. नांदेडचे कराड आणि ठाण्यातील (Thane) संदीप लेले (Sandeep Lele) यांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. पहिल्या तीन मध्ये पक्षाचा चौथा अधिकृत उमेदवार म्हणून डॉ अजित गोपचडे यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. गोपचडे हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) संघाचे सेवक. त्यांनी काही काळ औरंगाबाद (Aurangabad) येथे पूर्ण वेळ प्रचारकाचे (Praharak) काम केले होते. कालांतराने ते भाजपात सक्रिय झाले.

नामांकन दाखल करते वेळी लातूरचे (Latur) रमेश कराड यांचाही अर्ज भरण्यात आला. यासंदर्भात माजी मंत्री आणि लातूरचे भाजपचे नेते संभाजी निलंगेकर (Sambhaji Nilangekar) यांनी TheNews21 शी त्याच दिवशी बोलतांना उमेदवार बदलला जाऊ शकतो, असे संकेत दिले होते. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नसले, कुठला तरी एक उमेदवार बदलला जाईल, असे त्यांच्या वक्तव्यावरून संकेत प्राप्त झाले होते.

निलंगेकर म्हणाले होते की, “ऐनवेळी काही अडचण नको म्हणून कराड यांचा अर्ज भरून घेण्यात आला आहे. पक्षाने आधी जाहीर केलेलेच चार उमेदवार हे अधिकृत असतील. पण पक्ष ऐनवेळी जो निर्णय घेईल, तो मान्य असेल.”

अर्थात त्यावेळी पडद्यामागे घडणाऱ्या राजकीय घडमोंडीचा थांगपत्ता लागणार नाही, याची काळजी पक्षाने घेतली होती, असा दावा भाजातील सूत्रांनी केला. सूत्रांच्या दाव्यानुसार, दोन माजी मंत्र्यांच्या समर्थक आमदारांनी (MLAs) डॉ गोपचडे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. या दोन सशक्त माजी मंत्र्यांनी स्वतःला तिकीट मिळत नसेल तर किमान त्यांच्या समर्थकाला तिकीट मिळावे असा आग्रह धरला होता. यापैकीच एका माजी मंत्रीच्या मागे 16 समर्थक आमदार उभे राहिलेत तर दुसऱ्या माजी मंत्र्यांच्या मागे 7 आमदार उभे राहिले.

“मराठवाड्यातील पक्षात सक्रिय नसलेले डॉ गोपचडे यांची उमेदवारी रद्द करून याच प्रदेशातील, आपण सांगू, त्या उमेदवाराला तिकीट मिळावे, असा आग्रह एका माजी मंत्र्याने धरला. निवडणूक झालीच तर पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ गोपचडे यांच्या विरोधात मतदान करू, असा इशारा या आमदारांनी दिला होता,” असा दावा भाजपातील सूत्राने केला.

या घडामोडीमुळे डॉ गोपचडे यांची उमेदवारी रद्द करून रमेश कराड या वंजारी (Vanjari) समाजातील कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात आली. कराड यांच्यासोबत लातूरमधील निलंगकेर पुढाकार घेताना दिसत असले तरी कराड हे पंकजा मुंडे यांचे समर्थक मानले जातात. माजी मंत्री प्रा राम शिंदे यांची मार्मिक प्रतिक्रिया, या नाट्यमय घडामोडीत कोणी बंडाचा झेंडा उगारला असेल आणि कोणाचा फायदा झाला असेल, याकडे अंगुलीनिर्देश दाखवत आहेत.

“पंकजा ताई यांना जे जमले ते मला जमले नाही,” अशी प्रतिक्रिया प्रा शिंदे यांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, एकनाथ खडसे यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना भाजपने खूप काही दिले आहे आणि आता त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजवावी, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष (state president) चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केली आहे. तर खडसे समर्थक आजी-माजी आमदार आणि कार्यकर्ते जळगावमध्ये (Jalgaon) बैठक घेऊन पुढची राजकीय रणनीती ठरवत आहेत.

दरम्यान, परिषद निवडणुकीतील या घडामोडीवर भाजपतील एका ‘उपऱ्या’ नेत्याने मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार पडणार आणि महाराष्ट्र काँगेसमध्ये आम्ही ज्योतिरादित्य शिंदे शोधला आहे, असा दावा करणाऱ्या महाराष्ट्र भाजपात सर्व काही ऑलबेल नाही,” असा दावा पाच वर्षांपूर्वी अन्य पक्षातून भाजपात गेलेले आणि पाच वर्षात कुठलेही महत्वाचे पद न मिळालेल्या एका नेत्याने व्यक्त केले. “आम्ही मूळ पक्षात जायला तयार आहोत पण आता त्यांना आमची गरज राहिलेली नाही,” असेही हा नेता म्हणाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here