@maharashtracity

मुंबई: टिपू सुलतान नामकरणावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (LoP Pravin Darekar) हे महाविकास आघाडी सरकारवर (MVA government) आगपाखड करत असले तरी 2013 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या (BJP Corporators) तत्कालीन नगरसेवकांनी एका मार्गाचे टिपू सुलतान (Tipu Sultan) नामकरण करण्याच्या प्रस्तावाला केवळ पाठिंबाच दिला नव्हता तर तसा प्रस्ताव मांडूनअनुमोदन दिले होते.

maharashtracity कडे याबाबत कागदपत्र उपलब्ध झाले आहेत. दि 27 डिसेंबर 2013 च्या या कागदपत्रानुसार एम पूर्व विभागातील बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून सुरू होऊन रफिक नगर नाल्यापर्यंत जाणाऱ्या शिवाजीनगर मार्ग क्रमांक 4 यास शहीद टिपू सुलतान मार्ग असे नामकरण करण्याचा प्रस्ताव (तातडीचे कामकाज क्र 312) मांडण्यात आला होता.

मुंबई महापालिकेच्या (BMC) दिनांक 27 सप्टेंबर 2013 रोजी झालेल्या सभेत ठराव क्रमांक (1290) हा बिनविरोध मंजूर करण्यात आला. हा ठराव होता एम पूर्व विभागातील बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून सुरू होणाऱ्या मार्गास शहीद टिपू सुलतान मार्ग असे नाव ठेवण्याबाबतचा.

या प्रस्तावाचे सुचक होते शिवसेनेचे नगरसेवक यशोधर फणसे (Yashodhar Phanse) तर तत्कालीन भाजप नगरसेवक आणि विद्यमान आमदार अमित साटम (MLA Amit Satam) यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले होते. 27 डिसेंबर 2013 च्या या सभेस भाजपचे 21 सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या या सभेच्या आधी 26 जुलै 2013 रोजी पूर्व प्रभाग समितीमध्ये हाच ठराव (क्रमांक 35) मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी पूर्व प्रभागात भारतीय जनता पक्षाचे विठ्ठल खरटमोल हे एकमेव नगरसेवक होते.

त्यानंतर दिनांक 24 डिसेंबर 2013 रोजी स्थापत्य समिती (उपनगरे) यांनीही ठराव क्रमांक 303 नुसार हा ठराव मंजूर केला होता. या सभेला भारतीय जनता पक्षाचे पाच नगरसेवक उपस्थित होते. त्यात कृष्णा पारस्कर, श्रीमती अलका केरकर, श्रीमती मनीषा चौधरी, श्रीमती रितू तावडे आणि श्रीमती राजश्री पालांडे या उपस्थित होत्या.

तर महापालिकेच्या 27 डिसेंबर 2013 च्या ज्या सभेने हा ठराव मंजूर केला (ठराव क्रमांक 1290) त्या सभेला जे 21 भाजप नगरसेवक उपस्थित होते, त्यांची नावे अशी – श्रीमती सविता कांबळे, विठ्ठल खरटमोल, श्रीमती मनीषा चौधरी, श्रीमती वीणा जैन, श्रीमती भावना जोबनपुत्रा, सेलवन तमिल, श्रीमती फाल्गुनी दवे, कृष्णा पारकर, श्रीमती राजश्री पालांडे, डॉक्टर राम बारोट, मोहन मिठबावकर, मुकेश मिस्त्री, श्रीमती ज्योत्स्ना मेहता, श्रीमती उज्वला मोडक, एडवोकेट मकरंद नार्वेकर, दिलीप पटेल, श्रीमती आसावरी पाटील, श्रीमती बिना दोषी, एडवोकेट ज्ञानमूर्ती शर्मा, श्रीमती राजश्री शिरवडकर आणि अमित साटम.

दरम्यान, अमित साटम यांनी दावा केला आहे कि ते स्थापत्य समिती (उपनगरे) चे कधीही सदस्य नव्हते आणि त्यांनी कधीही टिपु सुलतान संदर्भातल्या कुठल्याही प्रस्तावाला अनुमोदन दिले नव्हते. साटम यांनी महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांना आव्हान दिले आहे की त्यांनी या संदर्भातली कागदपत्रे जाहीर करावीत अन्यथा त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा defamation suit) दाखल केला जाईल.

maharashtracity ने आमदार अमित साटम यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी दूरध्वनी व text संदेशद्वारे संपर्क साधला, मात्र साटम यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान, भाजपचे माजी आमदार राज पुरोहित (Raj Purohit) यांनी टिपू सुलतान नामकरणावरून काँग्रेसचे मंत्री असलम शेख (Congress Minister Aslam Shaikh) यांनी पाकिस्तानात (Pakistan) निघून जावे असा सल्ला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here