Twitter : @NalavadeAnant

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुटप्पी भूमिका ही आपल्याला आगामी निवडणुकीत अडचणीची ठरू शकते. त्या दृष्टिकोनातून आपण तयारीला लागले पाहिजे, असे आदेश उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या शहरातील ठाकरे गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची मातोश्री निवासस्थानी बैठक घेण्यात आली. या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत असताना निवडणुका कधीही लागू शकतात, त्या दृष्टिने कामाला लागा, असे आदेश दिले.

सर्वच राजकीय पक्ष हे आपल्या कार्यकर्त्यांना नेहमीच चार्ज करण्यासाठी निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी कामाला लागा, अशा प्रकारचे आदेश देतच असतात. मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीसाठी मुंबई आणि मुंबईच्या आसपासचे एम एम आर क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी तयार राहण्याचे आदेशच आज ठाकरे यांनी दिले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर असताना कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावरून उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज असल्याचे त्यांनी ठाकरे यांनाही सांगितल्याचे सूत्रांकडून कळते. महाविकास आघाडीच काय करायचं, याबद्दल आम्ही बसून ठरवू, असं देखील ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुटप्पी भूमिका ही आपल्याला आगामी निवडणुकीत अडचणीची ठरू शकते. त्या दृष्टिकोनातून आपण तयारीला लागले पाहिजे, असे आदेश देखील ठाकरेंनी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here