सिंधुदूर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्थेसाठी जमीन देणार

0
332

माजी राज्यमंत्री दीपक केसरकर यांची मागणी मान्य

@maharashtracity

मुंबई: आयुष मंत्रालयाअंतर्गत (Ministry of Ayush) नॅशनल इन्स्टीट्युट ऑफ मेडीसिनल प्लांटस ही संस्था सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मौ.अडाळी येथे स्थापन करण्याच्या केंद्र शासनाच्या प्रस्तावास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. या संस्थेसाठी ५० एकर जागा देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

माजी राज्यमंत्री आणि शिवसेनेचे (Shiv Sena) सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी या प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा केला होता.

मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) होते. मौ.अडाळी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) यांची ५० एकर जागा ही संस्था स्थापन करण्यासाठी विनामूल्य नियमित अटी शर्तींवर कब्जा हक्काने केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालय, नवी दिल्ली यांना हस्तांतरीत करण्यात येईल.

राज्यात राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्थेच्या स्थापनेमुळे स्थानिकांना (son of soil) रोजगाराच्या (employment) संधी निर्माण होतील आणि ही संस्था राज्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या फायदेशीर ठरेल.

औषधी वनस्पतींशी संबंधित सर्व बाबींसाठी राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्था एक स्टॉप सेंटर (one stop center) म्हणून विकसित केली जाईल आणि ते केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने समन्वयाने कार्य करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here