@maharashtracity

मुंबई: राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या (medical college students) दि. २ जून  पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता दि. १० जून ते ३० जून २०२१ या दरम्यान घेण्यात येणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रती कुलपती अमित विलासराव देशमुख (Amit Deshmukh) यांनी आज दिली.

वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षासंदर्भात  आज मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षांमध्ये एम.बी.बी.एस., बी.डी.एस., बी.ए.एम.एस., बी.यु.एम.एस., बी.एच.एम.एस., बी.पी.टी.एच., बी.ओ.टी.एच. आणि बी.एस.सी.नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा  समावेश आहे.

या वैद्यकीय पदवी  परीक्षां सोबतच मॉडन मिड लेव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर कोर्स तसेच सर्टिफिकेट कोर्स इन फर्माकॉलॉजी या परीक्षाही या कालावधीत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here