Twitter: @the_news_21

फिरवली भाकरी

वादळात हिंडणारा तू 

कधी हरला नाही पावसातही,

वाहिले नदी आणि नाले बहु

भाजपाला कधी पावला नाही….

करपायच्या आत फिरवून

भाकरीचा पॉवर प्ले आहे

पक्षांतर्गत असंतोषाचा, इथं

राष्ट्रवादी मातीचा क्ले आहे…

पक्ष शरदाच्या चांदण्याला 

पक्ष मजबुतीची साज होती

आल्या कितीही लाटा, तरी

झाकणारी ती लाज होती….

एकदा लक्ष्य केलं, की केंद्राच्या

सोबतीला ईडीची खाज आहे,

निवृत्ती पवारांची असली, तरी

देशभर धुडगूशीची ती माज आहे……

– संतोष मासोळे, धुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here