By Sadanand Khopkar

Twitter : @maharashtracity

पंधराव्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील महाराष्ट्र कन्या दिव्यांग खेळाडू अनुराधा सोलंकी हिने ब्रॉंझ मेडल संपादन केले आहे याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

हरियाणाच्या कर्नाल येथे २४ ते २८मार्च २०२३ या दरम्यान या स्पर्धा झाल्या.देशभरातून अठरा राज्यांतील खेळाडू या स्पर्धेसाठी सहभागी होते.डावा हाताने पोलियोग्रस्त असलेल्या अनुराधा हिने महाराष्ट्राचे नेतृत्व करताना संघाला आठ पारितोषिके मिळवून दिली.

जागतिक स्तरावर व्हिलचेअर तलवारबाजीत ३८व्या रॅंकवर असलेल्या अनुराधा सोलंकी हिचे स्वप्न आहे ऑलिंपिकमध्ये देशाला मेडल मिळवून देणे.

यापूर्वी २०१९साली नेदरलँड आणि २०२२ मध्ये पोलंड येथे झालेल्या स्पर्धेत अनुराधाने देशाचे प्रतिनिधित्व करताना जाणकारांचे लक्ष वेधून घेतले होते.संतोष शेजवळ, गणेश जाधव, महेंद्र हेमले , पॅरा ऑलिंपिक महाराष्ट्रचे, नंदकिशोर नालेसर या आपल्या मार्गदर्शक गुरुंमुळेच आपण येथवर प्रगती करू शकलो अशी कृतज्ञता अनुराधा सोलंकी व्यक्त करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here