पाच वर्षांनी वाढले रक्त दर

Twitter: maharashtracity

मुंबई: नुकतीच झालेल्या औषधांच्या दरवाढी पाठोपाठ आता राज्यात रक्ताचे दर ही वाढले असल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. सरकारी रक्तपेढ्यांमधून मिळणारी ८५० रुपये किमतीची रक्ताची पिशवी आता ११०० रुपयांना मिळणार आहे. दरम्यान दर तीन वर्षांनी होणारी ही दरवाढ यंदा मात्र पाच वर्षांनी झाली असल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. अरुण थोरात यांनी दिली.

दरम्यान सरकारी तसेच संस्थांच्या रक्तपेढ्याकडून पुरविणाÚया रक्ताचे दर केंद्र सरकार ठरवते. या केंद्र सरकारकडे नवीन दराचा प्रस्ताव राज्य रक्त संक्रमण परिषदेने पाठविला होता. यावर शिक्कामोर्तब झाले. ते नवे दर घोषित करण्यात आले. यावर बोलताना राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले की यावेळची दरवाढ ही ५ वर्षांनी करण्यात आली आहे. सांगितल्याप्रमाणे रक्त आणि रक्तातील घटक यांचे दरवाढ झाली आहे. सरकारी रक्तपेढीत एका रक्त युनिटचा दर १,०५० एवढा असून अनुदानाखाली हेच युनिट सर्वसामान्यांना ८५० रुपयांना पडते. यात दरवाढ झाली असून आता १,१०० रुपये मोजावे लागणार आहेत. तर खासगी रक्तपेढ्यांमध्ये १,५५० रुपये मोजावे लागणार आहेत. दरम्यान फ्रेश फ्रोझन प्लाझ्मा, क्रायोप्रेसिपिटेट आणि प्लेटलेट कॉन्सन्ट्रेटच्या दरात वाढ झाली नसून प्लेटलेट अॅफेरेसिस प्रक्रिया शुल्काचे दरही तेच राहणार असल्याचे सांगण्यात आले. यावर रक्तपेढीतील एका डॉक्टरच्या मते सध्या रक्तपेढ्यांच्या जागा तसेच तेथील कर्मचाÚयांचा पगार, रक्त चाचणीचे किट अशा अनेक बाबींवर एका रक्त युनिट म्हणजे पिशवीचा दर लावला जातो. यात इतर बाबींचा दर वाढल्याने साहजिकच रक्त युनिटचेही दर वाढले असल्याचे त्या डॉक्टरने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here