मुख्यमंत्री म्हणतात नाणारमध्येच प्रकल्प होणार!

मुंबई: आरे मधील मेट्रो कार डेपोच्या जागेवरून भारतीय जनता पक्षाला आणि सरकारला अडचणीत आणणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबरदस्त चपराक दिली आहे. महाजनदेश यात्रेदरम्यान रत्नागिरीत सभेला संबोधित करतांना फडणवीस म्हणाले की तेल शुद्धीकरण प्रकल्प नाणार येथेच व्हायला पाहिजे ही माझी पूर्वीपासून भूमिका होती. आता लगेच घोषणा करत नाही, पण पुन्हा तुमच्याशी संवाद साधू. मुख्यमंत्र्यांनी थेट जाहीर केले नसले तरी राज्यातील विधानसभा निवडणूक झाल्यावर नाणार येथेच प्रकल्प उभा राहील हे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, असे झाल्यास ज्या गुजराथी, जैन गुंतवणूकदारांनी नानारमधील जमिनीत रक्कम गुंतवली आहे, त्यांची गुंतवणूक सार्थकी लागणार यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प रद्द करावी अशी अट घातली होती. मुख्यमंत्र्यांनी ती अट मान्य करून युती केली होती. लोकसभेत भाजपला प्रचंड बहुमत मिळाले. काश्मीरमधील 370 कलम हटविल्यानंतर देशभरात देशभक्तीचे जी लाट उसळली आहे, त्यातून राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येणार याची स्पष्ट दिसत आहे. या परिस्थितीत भाजपला शिवसेनेची गरज राहिलेली नाही.
भाजपचा अंतर्गत सर्वेक्षण अहवालही हेच सांगतोय की स्वतंत्र लढल्यास भाजप एकहाती सत्ता प्राप्त करू शकेल. याच आत्मविश्वासामुळे भाजप आणि मुख्यमंत्री यांची भाषा गेल्या काही दिवसात बदलली आहे.

दरम्यान, शिवसेनेने आरे कार डेपोवरून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पुढे करून उद्धव ठाकरे फडणवीस यांना असचणीत आणत आहे. मेट्रो प्रकल्पच्या अंतिम टप्प्यात सेनेने सरकार, भाजप आणि फडणवीस यांना अडचणीत आणल्याने स्वतः मुख्यमंत्री अस्वस्थ आहेत. यातूनच त्यांनी आज रत्नागितीत सेनेला असचणीत आणण्यासाठी नाणारचा मुद्दा पुढे आणला असावा.

ज्या सेनेमुळे नाणार प्रकल्प रद्द करावा लागला, त्याच सेनेला शह देण्यासाठी मुख्यमंत्री हा प्रकल्प नाणार येथेच पुनरुज्जीवित करण्याची शक्यता आहे. असे झाल्यास सेना नैतिक दृष्ट्या पराभूत होईल, सेनेचे आमदार राजन साळवी, खासदार विनायक राऊत यांच्या अस्तित्वाला धक्का बसेल आणि मोठ्या रकमा देऊन नाणार येथे जमिनी विकत घेणाऱ्या गुंतवणूकदारांचा मोठाच लाभ होणार आहे.

दरम्यान, भूमीपुत्रांचा विरोध असल्याने शिवसेनेने नाणार ला विरोध केला होता, अशी सारवासारव आदित्य ठाकरे यांनी केली आहे. विकासाला आपला विरोध नाही, असेही आदित्य म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here