Twitter: @maharashtracity

मुंबई: निवासी डॉक्टरांच्या मध्यवर्ती मार्ड संघटनेची नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटनेचा पदभार नव निर्वाचित कार्यकारी समितीला सुपूर्द करण्यात आला. यावेळी नव निर्वाचित अध्यक्ष डॉ. अभिजित हेलगे आणि सचिव राहुल मुंडे यांची अभिनंदन करण्यात आले.

राज्यव्यापी निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्या महाराष्ट्र राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर निवासी डॉक्टरांच्या नवीन स्थानिक कार्यकारिणी मागील तीन महिन्यात स्थापन झाल्या आहेत. त्यानुसार मध्यवर्ती मार्ड संघटनेच्या नव्या पदाधिकारी निवडीचा निडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व शासकीय व पालिका वैद्यकीय महाविद्यालयातर्फे संघटनेच्या नवीन कार्यकारी अध्यक्ष म्हणून डॉ. अभिजित हेलगे मुंबई तर सचिव म्हणून डॉ. राहुल मुंडे आंबेजोगाई यांची निवड करण्यात आली आहे.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here